Paris Paralympics 2024 : नेमबाज रुबिनाची कांस्यपदकाला गवसणी, भारताची पदकसंख्या पोहचली 5 वर ….

Paris Paralympics 2024 (Women’s 10m Air Pistol SH1 event) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताने 5 वे पदक जिंकले आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने चार पदके जिंकली होती. आता तिसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झाले आहे. भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदके अशी पाच पदके जिंकली आहेत. रुबिना फ्रान्सिसने (Rubina Francis) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल (SH1) स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक जिंकले आहे. यासह पिस्तुल स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला पॅरा-शूटिंग अॅथलीट ठरली आहे.
इराणच्या खेळाडूने जिंकले सुवर्ण…
या स्पर्धेत इराणच्या सारेह जावनमर्दीने सुवर्णपदक तर तुर्कीच्या आयसेल ओझगानने रौप्यपदक पटकावले. रुबिना फ्रान्सिसने अंतिम सामन्यात 211.1 गुण मिळवले. तर सारेह जावनमर्दीने 236.8 गुण तर आयसेल ओझगानने 231.1 गुण मिळवले.
And that’s medal no. 5⃣ for 🇮🇳 at #ParisParalympics2024🤩🤩
Rubina Francis’ magic prevails, she claims a #Bronze🥉in #ParaShooting P2 – Women’s 10m Air Pistol SH1 event with a score of 211.1🥳🤩
She becomes 1st Indian female para-shooting athlete to win a medal in Pistol event.… pic.twitter.com/dQ1EjVUzD3
— SAI Media (@Media_SAI) August 31, 2024
अंतिम फेरीत रुबिना शेवटच्या फेरीपूर्वी दुसऱ्या स्थानावर होती. पण त्यानंतर तिला फक्त 9.2 आणि 8.9 गुण मिळवता आले. तुर्कियेच्या आयसेलने 10.1 आणि 10.4 गुण मिळवताना दुसरे स्थानावर कब्जा केला.
Paris Paralympics 2024 : भारताचा पदकांचा चौकार, नेमबाजीत मनीष नरवालनं केली कमाल….
नेमबाजीत भारताचे चौथे पदक…
रुबिना फ्रान्सिसने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल (SH1) स्पर्धेत जिंकलेले कांस्यपदक हे पॅरिस पॅरालिम्पिकमधील नेमबाजीतील भारताचे हे चौथे पदक आहे. अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल यांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारात पदक जिंकले. अवनीने सुवर्ण तर मोनाने कांस्यपदक जिंकले. मनीष नरवालने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल नेमबाजीत रौप्यपदक पटकावले. याव्यतिरिक्त ॲथलेटिक्समध्ये भारताला एक पदक मिळाले. प्रीती पाल हिने 100 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले होते.

