Paris Paralympics 2024 : नितेश कुमारची अंतिम फेरीत धडक, सुवर्णपदकापासून फक्त एक पाऊल दूर…

Paris Paralympics 2024 (Badminton, Men’s Singles SL3 semifinals) : पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी कायम आहे. आता भारतीय पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमारने इतिहास रचला आहे.
नितेशने उपांत्य फेरीच्या लढतीत जपानच्या डायसुके फुजिहाराचा पराभव करून पुरुष एकेरीच्या एसएल3 (SL3) प्रकारातील अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. यासह त्याने भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले आहे. त्याने जपानच्या खेळाडूचा 21-16, 21-12 असा पराभव केला. नितेश आता सोमवारी सुवर्णपदकासाठी मैदानात उतरणार आहे.
Medal Confirmed!🏅#ParaBadminton🏸: Men’s Singles SL3 semifinals👇🏻
After showing some electrifying #badminton in the knockout round, Nitesh Kumar reaches his first #Paralympics final, beating Japan’s🇯🇵 Daisuke Fujihara 21-16, 21-12.
With this win, he becomes India’s first… pic.twitter.com/pAnowVdkf5
— SAI Media (@Media_SAI) September 1, 2024
आयआयटी (IIT) मंडीचा पदवीधर असलेला नितेशला 2009 मध्ये एका अपघातात अपंगत्व आले होते. आता नितेशने खात्री केली आहे की तो एसएल3 (SL3) प्रकारात पदक घेऊन मायदेशी परतेल. याआधी प्रमोद भगतने तीन वर्षांपूर्वी टोकियोमध्ये पॅरा बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
आता अंतिम फेरीत नितेशचा सामना ब्रिटनच्या डॅनियल बेथेलशी होणार आहे. ब्रिटनच्या डॅनियल बेथेलने अन्य उपांत्य फेरीत थायलंडच्या बॅन्सन मोंगखॉनचा 21-7, 21-9 असा पराभव केला आहे.





