Paris Olympics 2024 (Athletics) : किरण पहल 400 मी. शर्यतीत 7व्या स्थानावर, रेपेचेज फेरीद्वारे आगेकूच करण्याची संधी…

Paris Olympics 2024 (Athletics,Women’s 400M Race) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सोमवारी महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या किरण पहल पाचव्या हिट्समध्ये सातव्या स्थानावर राहिली. त्यामुळे तिला उपांत्य फेरी गाठता आली नाही. आता तिला रेपेचेज फेरीमध्ये धावावे लागणार आहे. महिलांची 400 मीटर रेपेचेज फेरी उद्या (मंगळवार,6 आॅगस्ट) भारतीय वेळेनुसार दुपारी 2:50 वाजता होणार आहे.
पाचव्या हिट्समध्ये डॉमिनिक रिपब्लिकच्या मारिडीनी पॉलिनोने हिट्स 49.42 सेकंदात शर्यंत पूर्ण करून पहिले स्थान मिळविले. अमिरिकेची आलिया बटलर हिने 50.52 वेळेसह दुसरे तर ऑस्ट्रियाची सुजैन गोगल-वालिने 50.67 वेळेसह तिसरे स्थान राखले. किरणने 52.51 वेळेसह शर्यत पूर्ण करताना सातवे स्थान राखले.
Women’s 400m Round 1️⃣
Kiran Pahal gives her all but is unable to make it to the final round at the #Paris2024Olympics.
She finishes the race🏃🏻♀️ in 7th position in Heat 5 with a timing of 52.51 seconds. The fastest 3 athletes from each Heat qualified for the finals.
Next up for… pic.twitter.com/Iw1ugFd52i
— SAI Media (@Media_SAI) August 5, 2024
हरियाणाच्या सोनीपत येथील रहिवासी असलेल्या किरण पहलने राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर शर्यतीतील प्रवेशाची पात्रता चमकदारपणे पार केली आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवला होती.
किरण पहलने 50.92 सेकंद वेळेसह महिलांच्या 400 मीटर उपांत्य फेरीच्या हीट 2 मध्ये अव्वल स्थान पटकावले होते. महिलांच्या 400 मीटरमध्ये पॅरिस 2024 ऑलिम्पिक पात्रता वेळ 50.95 सेकंद अशी होती.





