Paris Olympics 2024 (Athletics) : अमेरिकेचा नोह लायल्स ‘सर्वात वेगवान धावपटू’, 100 मी. शर्यतीत जिंकले सुवर्ण पदक

Paris Olympics 2024 (Athletics,Men’s 100m Race,Noah Lyles) :- अमेरिकाच्या नोह लायल्सने पुरुषांच्या १०० मीटर धावण्यात सुवर्णपदक पटकावताना ‘सर्वात वेगवान धावपटू’ या किताबावर शिक्कामोर्तब केले. जमैकाच्या किशाने थॉमसनला ०. ५ सेकंदाच्या फरकाने मागे टाकताना नोहने सुवर्णपदकाला गवसणी घातली. ही शर्यंत नोहने ९.७८४ सेकंदात जिंकली.
अमेरिकेचा फ्रेड केर्लीने कांस्यपदक मिळविले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाविणारा इटलीचा जेकब लोमंट मार्सेल पाचव्या स्थानी राहिला. जेकबने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
FIRST GOLD FOR THE U.S. IN 20 YEARS IN THE MEN’S 100M 🤯 pic.twitter.com/LZXZLBDZiR
— Bleacher Report (@BleacherReport) August 4, 2024
यापूर्वी अमेरिकेसाठी जस्टिन गॅटलिनने अथेन्स ऑलिम्पिकच्या स्प्रिंटमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती. त्यानंतर नोह लायल्सने सुवर्ण कामगिरी केली आहे. लायल्सने मागील वर्षी विश्व चॅम्पियन स्पर्धेत १०० आणि २०० मीटरमध्ये विजेतेपद मिळविले होते. त्यामुळे विश्वास दुणावलेल्या नोह लायल्सने ही शर्यत ९.७८४ सेकंदात पूर्ण करताना सर्वश्रेष्ठ वेळेची नोंद केली. रौप्य पदक विजेत्या थॉम्पसनने ९.७८९ सेकंदात तर कांस्य पदक विजेत्या केर्लीने ९.८१० सेकंदात शर्यंत पूर्ण केली.
वेळेमुळे निकालांना उशीर..
नोह लायल्स आणि किशाने थॉमसन या दोघांमध्ये केवळ ०.०५ सेकंदाचा फरक होता. त्यामुळे सामानाधिकारी यांना सामान्य वेळेपेक्षा जास्त वेळ निकाल देण्यासाठी घेतला. त्यावेळी सर्वांच्याच चेहऱ्यावर नक्की विजेता कोण होणार याची उत्सूकता होती. त्यानंतर लायल्सला विजेता घोषित करण्यात आले. रियो आणि टोकियो या दोन्ही स्पर्धामध्ये पदकापासून वंचित राहिलेला दक्षिण आफ्रिकेच्या अकाने सिमबाईनला यावेळी देखील पदकापासून दूर राहावे लागले. त्याला चौथे स्थान मिळाले.





