Paris Olympics 2024 (Wrestling) : दुखापतीने निशाचा विजय घेतला हिरावून, पण नशिबाने साथ दिली तर 24 तासांत…

Paris Olympics 2024 (Women’s Wrestling Freestyle 68 KG, QF) : भारताची स्टार कुस्तीपटू निशा दहियाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. महिलांच्या 68 किलो वजनी गटात तिचा सामना उत्तर कोरियाच्या पाक सोल गुम हिच्याशी होता. सोल हिने 10-8 ने लढत जिंकली. अशाप्रकारे निशा उपांत्य फेरीत प्रवेश करण्यास मुकली.
सुरुवातीला तिने सोलवर आघाडी घेत सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व मिळवले होते. पण हाताला झालेल्या दुखापतीनंतर दुर्दैवाने सामना तिच्या हातातून निसटला आणि शेवटी तिला पराभवाला सामोरं जावे लागले. पण पण नशिबाने साथ दिली तर तिला सामन्यात पुढे जाण्याची आणखी एक संधी असेल.
Result Update: Women’s Wrestling 🤼♀ Freestyle 68 KG QF👇
A painful exit for Nisha Dahiya at #ParisOlympics2024💔
The 25-year-old fought well but sustained an injury mid-game which saw her lose against North Korea’s Pak Sol Gum 8-10.
Tough luck, Nisha. You made all of us… pic.twitter.com/dUfyu1SMYo
— SAI Media (@Media_SAI) August 5, 2024
निशाने लढतीच्या सुरूवातीलाच 4 गुण मिळवत आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीपर्यंतही ती आघाडीवर होती पण त्यानंतर तिच्या उजव्या हाताला दुखापत झाली. फिजिओने तपासल्यानंतर ती मॅचमध्ये फिकी पडल्याचे दिसली. यानंतर तिला पुन्हा अस्वस्थ वाटू लागले आणि तिने सामन्यादरम्यान ब्रेक घेतला. फिजिओने हातावर स्प्रे मारला आणि पुन्हा सामना सुरू झाला. पण एवढे करूनही तिच्या वेदना कमी झाल्या नाहीत. ती मॅटवर अक्षरशा: रडताना दिसली.
wrestling 💔:Nisha Dahiya loses from 8-2 to 8-10.
One finger dislocation and one shoulder dislocation almost . She gave it her all.#Paris2024 #Cheer4Bharat #wrestling@mansukhmandviya, @IndiaSports, @MIB_India, @PIB_India, @DDNewslive, @DDIndialive, @AkashvaniAIR, @Media_SAI pic.twitter.com/0MxGtHpxv0
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 5, 2024
महिलांच्या कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात निशा दहियाने शानदार सुरुवात केली होती. तिने उत्तर कोरियाच्या पाक सोल गुमविरुद्ध 4-0 अशी आघाडी घेतली होती आणि त्यानंतर दुखापतीपूर्वी निशा 8-2 अशी आघाडीवर होती, परंतु शेवटच्या 33 सेकंदात सामना फिरला आणि पाक सोल गुमने विजय 10-8 ने मिळवला.
नशीबानं साथ दिली तर मिळेल एक संधी….
उपांत्यपूर्व फेरीत पराभूत होऊनही निशाला पदक गाठण्याची संधी असेल. नियमांनुसार, निशाला हरवणारी कोरियन कुस्तीपटू सोल गुम पाक अंतिम फेरीत पोहोचली, तर निशाला रेपेचेज फेरीत संधी मिळू शकते. असे झाल्यास ती उपांत्य फेरीत कामगिरी करताना दिसणार आहे. हा सामना 24 तासांच्या आत खेळवला जाईल. उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूने उपांत्य फेरी गाठली आहे. तिचा सामना अमेरिकन खेळाडूशी होणार आहे. सोल गुम पाकने हा सामना जिंकल्यास निशाला रिपेचेज खेळण्याची संधी मिळेल. त्याचवेळी अमेरिकन खेळाडू जिंकल्यास निशाला संधी मिळणार नाही.
रेपेचेज फेरी म्हणजे काय?
रेपेचेज फेरी म्हणजे जे खेळाडू पहिल्या फेरीतील त्यांच्या अंतिम स्थानाच्या आधारे पुढील फेरीसाठी पात्र ठरू शकत नाहीत त्यांना रेपचेज फेरीमध्ये भाग घेऊन उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याची दुसरी संधी दिली जाते म्हणजेच रेपेचेज ही एक अशी फेरी आहे, ज्यामध्ये सुरुवातीच्या फेरीत पराभूत झालेल्या खेळाडूंना पुनरागमन करण्याची संधी मिळते. रेपेचेज हे प्रामुख्याने कुस्तीशी संबंधित आहे. बीजिंग 2008 मध्ये थेट नॉकआऊट फॉरमॅट सुरू करण्यात आला होता तेव्हा ऑलिम्पिकमध्ये रेपेचेजचा प्रथम वापर करण्यात आला. तेव्हापासून हा फ्रीस्टाइल आणि ग्रीको-रोमन कुस्तीचा भाग आहे. पॅरिस 2024 ऑलिम्पिकपासून अॅथलेटिक्समध्ये रेपचेजचा समावेश करण्यात आला आहे. 200 मीटर ते 1500 मीटर (हर्डल्स इव्हेंटसह) सर्व वैयक्तिक अॅथलेटिक्स ट्रॅक इव्हेंटमध्ये रेपचेज फेरीचा समावेश करण्यात आला आहे.





