Pune District: इंदापूरचा सागर देवकातेने पटकाविला अमृतेश्वर केसरी किताब

पिरंगुट : कोंढुर (ता. मुळशी) येथे झालेल्या अमृतेश्वर केसरी किताब कुस्ती स्पर्धेत इंदापूरचा सागर देवकाते विजयी ठरला. त्याला रोख एक लाख रुपये, मानाची गदा व अमृतेश्वर केसरी किताब देऊन गौरवण्यात आले. तर मुठ्याचा साहिल मोहोळ उपविजेता ठरला. त्यास रोख पन्नास हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले.
कोंढुर येथे यात्रेनिमित्त या भव्य जिल्हा व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माजी सभापती व मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी नियोजन केले होते. मध्ये 180 स्पर्धक सहभागी झाले होते.
दोन दिवसीय यात्रेमध्ये निशान पूजन, मिरवणूक, शेजारील असलेल्या जातेडे व डावजे येथील निशांत काठीच्या आगमन व भेट पालखी सोहळा, छबिना मिरवणूक आदी कार्यक्रम संपन्न झाले. पंच म्हणून राष्ट्रीय पंच चंद्रकांत मोहोळ, निलेश मारणे, राकेश सोरटे, संजय दाभाडे, प्रवीण राजिवडे, कौशल्य मातेरे, पप्पू कालेकर, हेमंत शितोळे यांनी काम पाहिले. तर बाबा लिमन यांनी समालोचन केले.
गटनिहाय निकाल पहिले तीन क्रमांक
35 किलो – विराट दस वारजे, आदित्य चव्हाण कोंढावळे, अवनिष कोकाटे, वेल्हा
40 किलो – संग्राम नलावडे खडकवासला, आयुष पिंगळे पौड, साईराज गायकवाड बहुली
48 किलो – अथर्व तौर कुंबेरी, श्री हेमगुडे खडकवासला, प्रणव चव्हाण कोंढावळे
57 किलो – मिलिंद हरणावळ इंदापूर, अथर्व गोळे पिरंगुट, समर्थ दाभाडे घोटावडे,
61 किलो – साहिल देशमुख भुगाव, श्रेयस तनपुरे हवेली, अथर्व काळभोर उरवडे
65 किलो – उदयसिंग मोरे हवेली, ओंकार पोळेकर मारणेवाडी, अविष्कार गावडे इंदापूर,
70 किलो – वेदांत पवार दौंड, भालचंद्र कुंभार हवेली, ऋषिकेश खाटपे भूकुम,
74 किलो – अनुदान चव्हाण कोथरूड, हितेश पवळे पिरंगुट, चैतन्य पिंगळे पौड
खुला गट – सागर देवकाते इंदापूर, साहिल मोहोळ मुठा, सुशांत तांबोळकर कोल्हापूर, चतुर्थ केदार मारणे सिद्धेश्वर.





