Paris Olympics 2024 (Women’s 10m Air Rifle) : भारतासाठी निराशाजनक बातमी, नेमबाज रमिता अंतिम फेरीत पराभूत…

Paris Olympics 2024 (Women’s 10m Air Rifle) : पॅरिस ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी नेमबाजीत भारताचे दुसरे पदक हुकले आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत भारतीय नेमबाज रमिता जिंदालला हाती निराशा लागली आहे. अंतिम फेरीत जिंदालने एकूण 145.3 गुण मिळवले आणि आठ नेमबाजांमध्ये ती सातव्या स्थानावर राहिल्यान तिचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंग पावले आहे.
या प्रकारात कोरियाच्या बान ह्योजिनने सुवर्ण, चीनच्या हुआंग युटिंग हिने रौप्य तर स्वित्झर्लंडच्या गोग्निएट ऑड्रे हिने कांस्यपदक जिंकले. रमिता जिंदाल हिने जरी पदक जिंकले नसले तरी वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी ऑलिम्पिक फायनलमध्ये खेळणे ही रमिता जिंदालसाठी मोठी कामगिरी आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिचा पराभव झाला असेल, पण आगामी काळात ती भारतासाठी सुपरस्टार ठरू शकते.
Ramita Jindal finishes 7th in the Final of Women’s 10m Air Rifle event.#Paris2024 #Cheer4Bharat #OlympicGames #shooting pic.twitter.com/1nVkF39LPX
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 29, 2024
यापूर्वी रमिता जिंदालने एकूण 631.5 गुणांसह अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. पिस्तुल नेमबाज मनू भाकरनंतर या ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवणारी ती भारताची दुसरी नेमबाज होती.
अवघ्या 24 तासांपूर्वी, भारतीय महिला नेमबाज मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकले होते. मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले. मनू भाकरने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला होता. नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.





