Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये फक्त 5 रिंग का असतात? जाणून घ्या, त्याचा अर्थ आणि पाच रंगांची कथा…

Paris Olympics 2024 : सध्या जगभरात पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची तयारी जोरात सुरू आहे. 2024 ऑलिम्पिक खेळ 26 जुलैपासून सुरू होणार आहेत आणि 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहेत आणि त्यात सुमारे 10 हजार खेळाडू सहभागी होणार आहेत.
परंतु जर आपण इतिहास पाहिला तर ऑलिम्पिक खेळ 1896 मध्ये सुरू झाले आणि बऱ्याच काळापासून ऑलिम्पिक चिन्हामध्ये आपल्याला 5 वर्तुळाकार रिंग दिसत आहेत, जे या खेळांचे प्रतीक आहेत. आज हे खेळ सुरू होऊन शतकाहून अधिक काळ लोटला आहे, पण एक मोठा प्रश्न आहे की फक्त 5 रिंग का आणि त्यांचा अर्थ काय?
ऑलिम्पिक रिंगचा अर्थ काय आहे?
डावीकडून उजवीकडे क्रमाने या 5 रिंग्सचे रंग निळे, पिवळे, काळा, हिरवे आणि लाल आहेत. वास्तविक, या 5 रिंगची रचना ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOC) चे माजी अध्यक्ष पियरे डू कौबर्टिन यांनी केली होती. हे पाच गोल रिंग वर्षापूर्वी सुरू झालेल्या ऑलिम्पिक चळवळीचे प्रतीक आहेत. ऑलिम्पिक रिंग जगातील 5 प्रमुख खंडांचे प्रतीक आहेत. हे पाच खंड पुढीलप्रमाणे आहेत: आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आशिया, युरोप आणि ऑस्ट्रेलियन खंडाच्या आसपासचे सर्व देश एकच खंड म्हणून गणले गेले आहेत.
पाच वेगवेगळ्या रंगाचा वापर का?
त्याचबरोबर रिंगमध्ये पाच वेगवेगळ्या रंगांचा वापर हाही आपल्यासाठी जटील प्रश्नासारखा आहे. पांढऱ्या पार्श्वभूमीसह निळा, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल हे रंग ऑलिम्पिक रिंगमध्ये आणले गेले कारण हे सर्व रंग जगातील जवळजवळ प्रत्येक देशाच्या ध्वजांमध्ये आढळतात. सर्व देशांची एकता आणि अखंडता राखण्यासाठी या 5 रंगांचा वापर करण्यात आला. हे पाच गोल (रिंग)जगभरातून खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंचेही प्रतिनिधित्व करतात.





