नवी दिल्ली : सन 1900 च्या हंगामानंतर पहिल्यांदाच क्रिकेट टी-२० स्वरूपात ऑलिंपिकमध्ये घेण्यात येणार आहे. २०२८ च्या ऑलिंपिकसाठी पाच अतिरिक्त खेळांमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. हा निर्णय २०२३ मध्ये घेण्यात आला होता. क्रिकेटच्या समावेशाच्या या निर्णयामुळे नवीन प्रेक्षक ऑलिम्पिकमध्ये येतील, जे जे ऑलिंपिक चळवळीच्या वाढीसाठी महत्त्वाचे ठरेल, अशी आशा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष सेबास्टियन को यांनी व्यक्त केली. को सध्या जागतिक अॅथलेटिक्सचे प्रमुख आहेत. सेबास्टियन को नोव्हेंबरमध्ये भारत भेटीवर आले होते. याचा संदर्भ देताना ते म्हणाले की, दक्षिण आशियाई समुदायाची लोकसंख्या दोन अब्जांपेक्षा जास्त आहे. क्रिकेटला आशियाई देशांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो. त्यामुळे या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यामुळे येथील लोकांकडूनही चांगला पाठिंबा मिळेल असे त्यांनी पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सांगितले. तर क्रिकेट निश्चित ऑलिम्पिकचा भाग लंडन आणि न्यू यॉर्कमध्ये आम्हाला भारतीय किंवा दक्षिण आशियाई समुदायाकडून मोठा पाठिंबा मिळतो. या प्रेक्षकांचे समर्थन समर्थन खूप मोठे असते. हे ऑलिंपिक चळवळीसाठी खूप महत्वाचे आहे. यामुळे ऑलिंपिकसाठी नवी बाजारपेठ खुली होईल. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे होणाऱ्या २०३२ च्या ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश होईल की नाही हे अद्याप माहित नाही, परंतु जर भारताला २०३६ च्या ऑलिंपिकचे आयोजन करण्याचा अधिकार मिळाला तर ते निश्चितच ऑलिंपिकचा भाग असेल, असे को बोलताना म्हणाले.