Paris Olympics 2024 : टेबल टेनिसमध्ये भारताच्या पदरी पुन्हा एकदा निराशा….

Paris Olympics 2024 (Men’s Table Tennis Team Round of 16) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाने टेबल टेनिसची उपांत्यपूर्व फेरी गाठून इतिहास रचला. पुरुष संघही अशीच कामगिरी करेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना चीनविरुद्ध निराशा हाती लागली. महिला संघाने टेबल टेनिसमध्ये इतिहास रचल्यानंतर पुरुष संघाला मात्र उप-उपांत्यपूर्व (Pre-quarter final) फेरीत चीनकडून 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला. यासह भारताचे आव्हान संपुष्टात आले.
भारताच्या संघात अनुभवी शरथ कमलसह हरमीत देसाई आणि मानव ठक्कर यांचा समावेश होता. बेस्ट ऑफ 5 फॉरमॅटमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात चीनने सलग तीन सेट 3-0 असे जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला.
Men’s Table Tennis Team Round of 16👇🏻
The Indian team of Harmeet Desai, Manav Thakkar, and Sharath Kamal lost to China🇨🇳 0-3
Take a look at the results👇🏻:
Harmeet Desai / Manav Thakkar lose to Long Ma / Wang Chuqin 2-11, 3-11, 7-11, 5-11.
Achanta Sharath Kamal loses to Fan… pic.twitter.com/BVxIg9xnS6
— SAI Media (@Media_SAI) August 6, 2024
पहिल्या सामन्यात दुहेरीच्या लढतीत एमए लाँग आणि चुकिन वांग या जोडीने हरमीत देसाई आणि मानव ठक्कर या भारतीय जोडीचा 11-2, 11-3, 11-7 असा पराभव केला.
Paris Olympics 2024 (Wrestling) : विनेश फोगटची उपांत्य फेरीत धडक, पदकापासून फक्त एक विजय दूर…
दुहेरीत पुरुष संघाचा पराभव झाल्यानंतर एकेरीत स्टार खेळाडू शरथ कमलकडून विजयाची अपेक्षा होती.मात्र दुसऱ्या सामन्यात चीनच्या जेनडॉन्ग फैन याने अचंता शरथ कमलचा 9-11, 11-7, 11-7, 11-5 असा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात चुकिन वांगने मानव ठक्करचा 11-9, 11-6, 11-9 असा पराभव केला आणि अशाप्रकारे मानव ठक्करचा शेवटच्या एकेरीत पराभव झाल्याने भारताचे पुढे जाण्याचे स्वप्न भंगले.





