Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकला भारतीय सुरक्षा कवच, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल व ‘के-9 श्वान पथक’ असणार तैनात….

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकला 26 जुलैपासून सुरुवात होत असून, या स्पर्धेची सुरक्षा यजमान फ्रान्ससाठी सर्वात मोठी समस्या बनली आहे. फ्रान्स सरकारने यासाठी तयारी केली असली, तरी याबाबतीत त्यांनी विविध देशांकडून मदत मागविली आहे. यात भारताच्या सहकार्याचाही समावेश आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी भारताच्या केंद्रीय सशस्त्र दल व विशेष कमांडो आणि श्वान पथक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच भारताचे 10 सदस्यीय विशेष सुरक्षा पथक पॅरिसला पोहोचले. ज्याचे नाव के-9(K-9) युनिट असे आहे. हे एक विशेष श्वान पथक असून, जे पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान खेळांची सुरक्षा हाताळण्यासाठी फ्रान्सच्या सुरक्षा एजन्सीसोबत काम करेल.
येत्या 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमधील विविध ठिकाणांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे एलिट डॉग स्क्वॉड के-9 युनिट तैनात करण्यात येणार आहे. एकूण दहा के-9 (K-9) युनिट सुरक्षेची जबाबदारी सांभाळतील आणि त्यापैकी दोन प्रथमच भारतातील असतील. हे श्वान पथक 10 जुलै रोजी पॅरिसला रवाना झाले होते आणि कठोर चाचणीनंतर भारताच्या या एलिट डॉग युनिटला क्रीडा महाकुंभाच्या सुरक्षेसाठी निवडण्यात आले आहे.
सीआरपीएफ (CRPF) च्या प्रशिक्षण शाळेत प्रशिक्षण आणि चाचणीनंतर K-9 युनिटमध्ये वास्ट (Vast) आणि डेनबी (Denby) यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) दोन K9 युनिट 10 जुलै रोजी पॅरिसला रवाना झाले, 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या विविध स्थळांना सुरक्षा पुरवण्यासाठी निवडलेल्या दहा युनिटपैकी K9 एक भाग म्हणून आहेत.
Two K9 teams from Central Reserve Police Force (CRPF) left for Paris on July 10, as part of the 10 K9 teams, selected to provide security to various venues of the upcoming Paris Olympics, 2024 scheduled from July 26 to August 11: CRPF
K9s Vast and Denby, both Belgian Shepherd… pic.twitter.com/wv9OG2a3c7
— ANI (@ANI) July 17, 2024
सीआरपीएफने एका निवेदनात म्हटले आहे, ” के-9 युनिटमधील बेल्जियन शेफर्ड मालिनॉइस जातीचे वेस्ट आणि डेन्बी हे श्वान, अनुक्रमे 5 आणि 3 वर्षे वयाचे आहेत, सीआरपीएफ (CRPF) च्या डॉग ब्रीडिंग अँड ट्रेनिंग स्कूलमध्ये आयोजित केलेल्या अनेक कठोर चाचण्यांनंतर या कार्यासाठी ते निवडले गेले आहेत.” उच्च प्रशिक्षित श्वान हे खेळांमध्ये प्रत्येकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. के-9 (K9) या युनिटकडे कडे स्फोटके, दारूगोळा आणि अंमली पदार्थ शोधण्याची अविश्वसनीय क्षमता आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या क्रीडा मंत्रालयाने 117 खेळाडूंच्या तुकडीला मान्यता दिली आहे, ज्यात 140 सपोर्ट स्टाफचा समावेश आहे जे खेळाडूंसोबत स्वतंत्रपणे प्रवास करतील. एकूण 72 एथलीट या खेळांमध्ये प्रथमच सहभागी होत आहेत, तर टोकियो ऑलिम्पिकमधील पाच पदक विजेते आणि दुसरे खेळाडू पदक जिंकण्याच्या इराद्याने स्पर्धेत सहभागी होत आहेत.





