Paris Olympics 2024 (Table Tennis) : मनिका-श्रीजाची विजयी सलामी तर शरथ कमलचे आव्हान संपुष्टात…

Paris Olympics 2024 (Table Tennis) – मनिका बत्राने टेबल टेनिसच्या महिला एकेरी गटात विजयाने सुरुवात केली आहे. तिने राउंड ऑफ 64 च्या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या एना हर्सीचा 4-1 असा पराभव केला. तिने पहिले तीन गेम 11-8, 12-10, 11-9 असे जिंकले. त्यानंतर अण्णाने तिसरा गेम 9-11 असा जिंकून सामन्यातील अंतर कमी केले. त्यानंतर मनिकाने चौथा गेम 11-5 अशा एकतर्फी फरकाने जिंकून सामना जिंकला.
तिच्यासह श्रीजा अकुला हिने राऊंड ऑफ 64 च्या सामन्यात स्वीडनच्या क्रिस्टीना कलबर्गचा 4-0 असा पराभव केला. तिने 32 च्या फेरीत प्रवेश केला आहे. 30 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात श्रीजाने 11-4, 11-9, 11-7 आणि 11-8 असा विजय मिळवला.
Paris Olympics 2024 (Badminton) : पी.व्ही. सिंधूनंतर प्रणॉयचीही विजयी सलामी…
दुसरीकडे, पुरुषांच्या टेबल टेनिसच्या राऊंड ऑफ 64 च्या सामन्यात अचंता शरथ कमलचा सामना स्लोव्हेनियाच्या कोजुल डेनीशी झाला. 49 मिनिटे चाललेल्या या सामन्यात कोजुल डेनीने 4-2 असा विजय मिळवला, अशाप्रकारे एकेरीतील त्याचे आव्हान संपुष्टात आले.





