Paris Olympics 2024 : नेमबाजीत भारताच्या पदरी निराशा, 10 मी एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात दोन्ही संघ पदकाच्या शर्यतीतून बाहेर

Paris Olympics 2024 (10M Air Rifle Mixed Team) : ऑलिम्पिक 2024 मध्ये 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात भारताला निराशेचा सामना करावा लागला. या स्पर्धेत सहभागी झालेले दोन्ही भारतीय संघ पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. या स्पर्धेत अर्जुन बबुता आणि रमिता जिंदाल ही भारतीय जोडी सहाव्या (628.7 गुण) स्थानावर तर इलावेनिल आणि संदीपची जोडी 12व्या (623.3 गुण) स्थानावर राहिली. पदकासाठीच्या फेरीत जाण्यासाठी टॉप 4 मध्ये स्थान मिळवावे लागले, जे त्यांना प्राप्त करता आले नाही.
Shooting Update 🚨Neither of the two Indian pairs in action were able to qualify for the final medal round in the mixed 10m air rifle team event.
In Qualification:
-Ramita & Arjun finished in 6th spot with 628.7 points.
-Elavenil & Sandeep finished in 12th spot with 626.3… pic.twitter.com/FZK4vyETo2— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 27, 2024
दुसरीकडे या प्रकारात ऑलिम्पिक 2024 मध्ये चीनने पहिले सुवर्णपदक जिंकले आहे तर कोरियाने रौप्यपदक पटकावले आहे. 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत नेमबाजीत त्यांनी हे पदक जिंकले आहे. चीन (हुआंग युटिंग आणि शेंग लिहाई) आणि कोरिया (केयूम जिह्योन आणि पार्क हाजुन ) यांच्यात अंतिम सामना झाला. यामध्ये चीनने बाजी मारत अव्वल तर कोरियानं दुसरे स्थान पटकावले.
चीननं कोरिया प्रजासत्ताकचा 16-12 असा पराभव केला. कझाकिस्तानने (एलेक्जेंड्रा ले आणि इस्लान सतपायेव) तीसरे स्थान मिळवत 2024 च्या ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक म्हणजेच कांस्पयपद जिंकले आहे. स्पर्धेत जर्मनीचा संघ (अन्ना जानसेन आणि मैक्सिमिलियन उलब्रिच) चौथ्या स्थानावर राहिला. या स्पर्धेत एकूण 28 संघांनी सहभाग घेतला होता.





