Paris Olympics 2024 : भारतीय खेळाङूंची पाचव्या दिवसाची कामगिरी…! जाणून घ्या,कोण जिंकलं अन् कोण हरलं…

पॅरिस (31 जुलै 2024) : भारताच्या महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने 75 किलो वजनी गटात नॉर्वेच्या सुनिवा हॉफस्टॅडचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर पुरूषांच्या 71 किलो वजनी बॉक्सिंग स्पर्धेत निशांत देवने इक्वेडोरच्या रॉड्रिग्ज टेनोरिओचा 3-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने महिला एकेरी स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिच्याशिवाय लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांनी आपापले सामने जिंकून पुरुष एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुढच्या फेरीत दोघेही आमने-सामने असणार आहेत.
स्वप्नील कुसळे 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि ऑलिम्पिकच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे. दुसरीकङे राजेश्वरी आणि श्रेयसी सिंग यांना महिला ट्रॅप स्पर्धेच्या पात्रता फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे दोघींही स्पर्धेतून बाहेर झाल्या आहेत.
महिलांच्या टेबल टेनिसमध्ये भारताच्या मनिका बत्रा आणि श्रीजा अकुला आपापल्या लढती गमावून बाहेर पडल्या आहेत.
दीपिका कुमारीने तिरंदाजीमध्ये प्रीक्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे.तर पुरुष एकेरीत तरुणदीप राय जवळचा सामना गमावल्याने ऑलिम्पिकमधून बाहेर पडला आहे.





