Paris Olympics 2024 (Athletics, 3000M Steeplechase Race) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताचा 10वा दिवस आहे आणि पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस शर्यत प्रकारातून भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा अविनाश साबळे पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. अविनाशने 8:15.43 अशी वेळ नोंदवत पाचव्या स्थानी राहिला.
GREAT!!!
India’s Avinash Sable clocks 8:15.45 to finish 5th in his heat and advance to medal round. Top 5 in each of 3 heats go to final.#Paris2024Olympics #ParisOlympics @Paris2024 #IndianAthletics— Athletics Federation of India (@afiindia) August 5, 2024
भारतीय खेळाडूने पहिल्या 1000 मीटरपर्यंत आघाडी घेत शर्यतीची जोरदार सुरुवात केली. मात्र, नंतर तो त्याच्या प्रतिस्पर्ध्यांच्या मागे पडला. त्याने पाचवे स्थान मिळवून अंतिम फेरी गाठली आहे.