Paris Olympics 2024 (Men’s 10m Air Rifle) : नेमबाजीमध्ये पुन्हा निराशा, अर्जून बाबौताचं पदक थोडक्यात हुकले…

Paris Olympics 2024 (Men’s 10m Air Rifle, Arjun Babuta) : भारताची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. भारताच्या अर्जुन बाबौताला 10 मीटर एअर रायफल पुरुष एकेरीत पदक जिंकण्यात अपयश आले आहे. अंतिम फेरीत अर्जुन 208.4 गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहिला आणि भारतासह अर्जुनचेही पदक जिंकण्याचे स्वप्न भंग पावले आहे. याआधी भारताच्या रमिता जिंदाललाही 10 मीटर एअर रायफल महिला एकेरीत पदक जिंकण्यात अपयश आले अंतिम फेरीत रमिता एकूण 145.3 गुणासह आठ नेमबाजांमध्ये सातव्या स्थानावर राहिली.
Well Played 🙌
Arjun Babuta finishes 4⃣th place in the Men’s 10m Air Rifle Final event.#Paris2024 #Cheer4Bharat #Olympics #Shooting pic.twitter.com/GlDS27QH8b
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 29, 2024
भारताचा स्टार नेमबाज अर्जुन बाबौता 16व्या शॉटपर्यंत पहिल्या तीनमध्ये होता. कधी दुसरा तर कधी तिसरा आला, पण अखेर पदक जिंकू शकला नाही. एकवेळ तो सुवर्णपदक विजेत्या शेंगच्या 0.1 गुणांनी मागे होता. मात्र, यानंतर त्याचा फॉर्म बिघडला आणि तो 16व्या शॉटनंतर चौथ्या स्थानावर घसरला. त्याच वेळी, चीनच्या शेंग लिहाओने 252.2 च्या ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक तर स्वीडनच्या व्हिक्टर लिंडग्रेनने 251.4 गुणांसह रौप्यपदक जिंकले. क्रोएशियाच्या मॅरिसिच मिरानने 230 गुणांसह कांस्यपदक जिंकले.
दरम्यान, याआधी दुसऱ्या दिवशी भारतीय महिला नेमबाज मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकले होते. मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले. मनू भाकरने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला होता. नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.





