Paris Olympics 2024 (Judo) : ज्युडोमध्ये भारताच्या हाती निराशा, तुलिका मान पहिल्याच फेरीत पराभूत…

Paris Olympics 2024 (Judo) : पॅरिस 2024 ऑलिम्पिकमधील एकमेव भारतीय ज्युडो खेळाडू तुलिका मान शुक्रवारी क्युबाच्या इडालिस ऑर्टिजकडून पराभूत झाल्यानंतर महिलांच्या +78 किलो वजनी गटाच्या प्राथमिक फेरीतून बाहेर पडली. तुलिकाला क्युबाच्या खेळाडूविरुद्ध 0-10 असा पराभव पत्करावा लागला.
तुलिका मान, 25, ही माजी दक्षिण आशियाई खेळांची चॅम्पियन आणि बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये रौप्यपदक विजेती आहे. पण तिला या प्रकारात दोन वेळा माजी विश्वविजेती आणि लंडन 2012 ची सुवर्णपदक विजेती ऑर्टिजकडून पराभव पत्करावा लागला.
🇮🇳😥 𝗧𝗼𝘂𝗴𝗵 𝗹𝗼𝘀𝘀 𝗳𝗼𝗿 𝗧𝘂𝗹𝗶𝗸𝗮! Tulika Maan faced defeat against Idalys Ortiz in the round of 32 in the women’s +78 kg category. Ortiz was awarded Ippon to claim victory.
🙌 No matter the result we are still very proud of you.
👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @sportwalkmedia… pic.twitter.com/qMbleA8nKW
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 2, 2024
बीजिंग 2008 मधील ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती आणि रिओ 2016 आणि टोकियो 2020 मधील रौप्य पदक विजेत्या ऑर्टिजने या स्पर्धेत मानचा पराभव करण्यासाठी फक्त 28 सेकंद घेतले. तुलिकाच्या पराभवाने ज्युडोमधील भारताची मोहीम संपुष्टात आली. कारण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती एकमेव खेळाडू होती. तुलिका मानने तिच्या रँकिंगच्या आधारे कॉन्टिनेंटल कोट्याद्वारे पॅरिस 2024 मध्ये प्रवेश केला होता.
तुलिका मान राउंड आॅफ 32 च्या फेरीत पराभूत झाली आहे, त्यामुळे जरी ऑर्टीझ अंतिम फेरीत पोहोचली तरी तिला रिपेचेज फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळणार नाही. ऑलिंपिक ज्युडो स्पर्धांमध्ये, फक्त उपांत्यपूर्व फेरीतील पराभूत स्पर्धकच कांस्यपदकासाठी रिपेचेज फेरीत प्रवेश करतात.





