Paris Olympics 2024 (Archery, Mixed Team Bronze Medal Match) : पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये मिश्र सांघिक तिरंदाजी प्रकारात भारतीय संघाच्या धीरज बोम्मादेवरा आणि अंकिता भकत या जोडीचा कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेशी सामना झाला, परंतु भारतीय जोडी 2-6 ने पराभूत झाली. अशाप्रकारे धीरज आणि अंकिताचे ऐतिहासिक कांस्यपदक थोडक्यात हुकले. त्यांना अमेरिकेच्या ब्रॅडी एलिसन आणि कॅसी कफहोल्ड यांच्या जोडीकडून पराभव स्वीकारावा लागला. ही लढत अमेरिकेने 38-37, 37-35, 34-38, 37-35 अशी जिंकली.
Result Update: #Archery🏹 Mixed Team Bronze Medal Match👇
A near miss for our archers💔.
Ankita Bhakat and @BommadevaraD agonizingly miss out on a podium finish at #ParisOlympics2024.
The 🇮🇳 Indian duo came close in a 4️⃣ set match by a score line of 2-6.
Keep your heads… pic.twitter.com/DQqw4GOrhF
— SAI Media (@Media_SAI) August 2, 2024
अत्यंत अटीतटीचा झालेला पहिला सेट अमेरिकेने 38-37 असा जिंकला. त्यानंतर अमेरिकन संघाने 37-35 असा दुसरा सेट देखील जिंकताना लढतीवर वर्चस्व प्रस्थापित केले. भारताच्या अंकिता आणि धीरज यांच्या जोडीने 34-38 असा चार गुणांच्या फरकाने तिसरा सेट जिंकताना लढतीतील उत्सूकता वाढविली. मात्र चौथ्या सेटमध्ये पुन्हा एकदा ब्रॅडी आणि कॅसी जोडीनं अचूक निशाना साधला. त्यामुळे भारताला चौथा सेट 37-35 असा गमवावा लागला. त्यामुळे तिरंदाजीतील पदकाचे भारतीय तिरंदाजांचे स्वप्न संपुष्टात आले.
तत्पूर्वी, उपांत्य फेरीत भारताच्या अंकिता आणि धीरज यांच्या जोडीने दक्षिण कोरियाच्या लिम सी-हेओम व किम वू जीन यांच्या जोडीकडून पराभव स्वीकारावा लागला. ही लढत दक्षिण कोरियाने 36-38, 38-35, 38-37, 39-38 अशी जिंकली. त्याआधी उपांत्यपूर्व फेरीत अंकिता आणि धीरज यांनी स्पेनच्या एलीया कॅनालेस आणि पाब्लो अचा यांच्या जोडीला 38-37, 38-38, 36-37, 37-36
असे पराभूत करताना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.