Paris Olympics 2024 : 18 दिवस, 16 क्रीडाप्रकार अन् 117 खेळाडू पदकासाठी सर्वस्व पणाला लावणार..! जाणून घ्या, ऑलिम्पिकमधील भारताचे संपूर्ण वेळापत्रक….

Paris Olympics 2024 India’s Schedule Dates and Event Times : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ या पाच वर्षांतून एकदा येणारा क्रीडा महाकुंभ आता अवघ्या एका दिवसावर येवून ठेपला असून यंदा भारताचे ११७ खेळाडू स्पर्धेतील १८ दिवस, १६ क्रीडाप्रकारांत आव्हान देताना पदक जिंकूण तिरंगा अभिमानाने फडकाविण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावताना दिसणार आहेत.
२६ जुलै रोजी सीन नदीच्या किनाऱ्यावर होणाऱ्या होणाऱ्या भव्यदिव्य व आगळ्यावेगळ्या उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्य स्पर्धेला सुरुवात होणार असली तरी भारतीय खेळाडू तिरंदाजीच्या पात्रता फेरीतून २५ तारखेपासूनच आपल्या मोहीमेची सुरुवात करणार आहेत. तरी भारतीय खेळाडू आपल्या प्रमाण वेळेनुसार कधी? कुठे आणि कुठल्या क्रीडाप्रकारात आव्हान देणार हे जाणून घेणे आता क्रमप्राप्त आहे. चला तर मग पाहुयात…..
२७ जुलै २०२४ (खेळ-वेळ (भारतीय प्रमाणवेळेनुसार))
बॅडमिंटन(गट सामने)- दु. १२.५० पासून
रोईंग-दु.१२.३० पासून
शूटिंग-दु. १२.३० पासून
बॉक्सिंग- संध्या. ७ पासून
हॉकी (भारत वि न्यूझीलंड)- रात्री ९ वा.
टेबल टेनिस- संध्या. ६.३० पासून
टेनिस- संध्या. ५.३० पासून
२८ जुलै २०२४
तिरंदाजी (मेडल मॅच)-दु. १ पासून
बॅडमिंटन- दु. १२ पासून
बॉक्सिंग- दु. २.४६ पासून
रोईंग- दु. १.०६ पासून
शुटिंग (मेडल मॅच)- दु. १.०६ पासून
जलतरण- दु. २.३० पासून
टेबल टेनिस- दु. १.३० पासून
टेनिस- दु. ३.३० पासून
२९ जुलै २०२४
खेळ-वेळ
तिरंदाजी (टीम मेडल मॅच)-दु. १ पासून
बॅडमिंटन- दु. १.४० पासून
हॉकी (भारत वि अर्जेंटिना)-दु. ४.१५ वाजता
रोईंग- दु. ०१.०० पासून
शूटिंग- दु. १२.४५ पासून
टेबल टेनिस-दु. १.३० पासून
टेनिस- दु. ३.३० पासून
३० जुलै २०२४
जलतरण (मेडल मॅच)- मध्यरात्री १२.५२ वा.
तिरंदाजी- दु. ०३.३० पासून
बॅडमिंटन- दु. १२.०० पासून
बॉक्सिंग- दु. ०२.३० पासून
अश्वारोहण- दु. ०२.३० पासून
हॉकी (भारत वि. आयर्लंड)- संध्या. ४.४५ वाजता
रोईंग- दु. ०१.४० पासून
शूटिंग (मेडल मॅच)- दु. ०१.०० पासून
टेबल टेनिस- दु. ०१.०० पासून
टेनिस- दु. ०३.३० पासून
१ ऑगस्ट २०२४
तिरंदाजी- दु. १ पासून
अॅथलेटिक्स- रात्री ११ पासून
बॅडमिंटन- दु. १२ पासून
बॉक्सिंग- दु. ०३.३० पासून
गोल्फ- दु. १२.३० पासून
हॉकी (भारत वि. बेल्जियम)- दु. ०३.३० वाजता
रोईंग- दु. ०१.२० पासून
सेलिंग- दु. ०३.३० पासून
शुटिंग (मेडल मॅच)- दु. १ पासून
टेबल टेनिस- दु. ०१.३० पासून
टेनिस- दु. ०३.३० पासून
२ ऑगस्ट २०२४
तिरंदाजी- दु. १ पासून
अॅथलेटिक्स- रात्री ९.३० पासून
बॅडमिंटन (उपांत्य फेरी)- दु. १२ पासून
बॉक्सिंग- संध्या. ७ पासून
गोल्फ- दु. १२.२० पासून
हॉकी (भारत वि ऑस्ट्रेलिया)- संध्या. ४.४५ वाजता
ज्युडो (मेडल मॅच)- दु. १.३० पासून
रोईंग (मेडल मॅच)- दु. १ पासून
सेलिंग- दु. ३.३० पासून
शुटिंग- दु. १२.३० पासून
टेबल टेनिस (उपांत्य फेरी)- दु. १.३० पासून
टेनिस (मेडल मॅच)- दु. ३.३० पासून
३ ऑगस्ट २०२४
तिरंदाजी (मेडल मॅच)- दु.१ पासून
अॅथलेटिक्स (शॉट पुट फायनल)- रात्री ११.०५ वाजता
बॅडमिंटन (मेडल मॅच )- दुपारी १२ पासून
बॉक्सिंग- संध्या. ७.३२ पासून
गोल्फ- दुपारी १२.३० पासून
रोईंग (मेडल मॅच)- दुपारी १.१२ पासून
सेलिंग- दुपारी ३.३० पासून
शूटिंग (मेडल मॅच)- दुपारी १ पासून
टेबल टेनिस (मेडल मॅच)- संध्याकाळी ५ पासून
टेनिस (मेडल मॅच)- वेळ निश्चित नाही
४ ऑगस्ट २०२४
तिरंदाजी (मेडल मॅच)- दुपारी १ पासून
अॅथलेटिक्स- दुपारी ३.३५ पासून
बॅडमिंटन (मेडल मॅच)- दुपारी १२ पासून
बॉक्सिंग (उपांत्यपूर्व/उपांत्य फेरी)- दुपारी २.३० पासून
अश्वारोहण (अंतिम फेरी)- दुपारी १.३० वाजता
गोल्फ (मेडल मॅच)- दुपारी १२.३० वाजता
हॉकी (उपांत्यपूर्व फेरी)- दुपारी १.३० पासून
सेलिंग- दुपारी ३.३० पासून
शुटिंग (अंतिम फेरी)- दुपारी १२.३० पासून
टेबल टेनिस (मेडल मॅच)- संध्याकाळी ५ पासून
५ ऑगस्ट २०२४
अॅथलेटिक्स (५ किमी)- रात्री १०.३४ पासून
बॅडमिंटन (मेडल मॅच)- दुपारी १.१५ पासून
सेलिंग- दुपारी ३.३० पासून
शूटिंग (अंतिम फेरी)- दुपारी १ वाजता
टेबल टेनिस- दुपारी १.३० पासून
कुस्ती- संध्या. ६.३० पासून
६ ऑगस्ट २०२४
अॅथलेटिक्स (लांब उडी अंतिम फेरी)- दुपारी १.५० पासून
बॉक्सिंग (उपांत्य फेरी)- दुपारी २ पासून
हॉकी (उपांत्य फेरी)- संध्याकाळी ३.३० पासून
सेलिंग (मेडल मॅच) – दुपारी ३.३० पासून
टेबल टेनिस- दुपारी ४ पासून
कुस्ती (मेडल मॅच)- दुपारी २.३० पासून
७ ऑगस्ट २०२४
अॅथलेटिक्स (३ किमी अडथळा)- स. ११ पासून
बॉक्सिंग- रात्री १ पासून
गोल्फ- दुपारी १२.३० वाजता
सेलिंग- सकाळी ११ वाजता
टेबल टेनिस- दुपारी १.३० वाजता
वेटलिफ्टिंग (४९ किलो)- रात्री ११ वाजता
कुस्ती (मेडल मॅच)- दुपारी २.३० वाजता
८ ऑगस्ट २०२४
अॅथलेटिक्स (भालाफेक अंतिम फेरी)- दुपारी १.३५ पासून
गोल्फ- दुपारी १२.३०
हॉकी (मेडल मॅच)- संध्या. ५.३० पासून
टेबल टेनिस- दुपारी १.३० पासून
कुस्ती- दुपारी २.३० पासून
९ ऑगस्ट २०२४
बॉक्सिंग (अंतिम फेरी)- दुपारी १.३२ पासून
अॅथलेटिक्स (मेडल मॅच)- दुपारी २.१० पासून
गोल्फ- दुपारी १२.३० वाजता
हॉकी (मेडल मॅच)- दुपारी २ वाजता
कुस्ती (मेडल मॅच)- दुपारी २.३० वाजता
११ ऑगस्ट २०२४
बॉक्सिंग (मेडल मॅच)- दुपारी १ पासून
महिला कुस्ती (मेडल मॅच)- दुपारी २.३० पासून





