Paris Olympics 2024 : भारतीय पुरुष-महिला तिरंदाजी संघाने मिळवला ऑलिम्पिक कोटा, ‘या’ आधारावर ठरले पात्र…

India secure team quotas in archery : भारतीय पुरुष आणि महिला तिरंदाजी संघाने मोठे यश मिळवत पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा प्राप्त केला. या संघाने पुरुष आणि महिला या दोन्ही गटात पात्र ठरू शकलेल्या देशांमध्ये अव्वल स्थान मिळवून ऑलिम्पिक कोटा निश्चित केला . सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या जागतिक तिरंदाजी क्रमवारीच्या आधारे भारताने पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे. भारत पॅरिसमधील सर्व पाच पदक स्पर्धांमध्ये (पुरुष आणि महिला संघ, वैयक्तिक आणि मिश्र श्रेणी) स्पर्धा करण्यास पात्र असेल. पुरुष गटात भारत आणि चीनने मानांकनाच्या आधारे कोटा मिळवला, तर महिलांच्या गटात इंडोनेशिया हा कोटा मिळवणारा भारताशिवाय दुसरा देश ठरला. ऑलिम्पिकमध्ये 12 देश सांघिक स्पर्धांमध्ये भाग घेतील, तर पाच संघ मिश्र स्पर्धांमध्ये भाग घेतील. तीन टप्प्यातील ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेबाहेर राहणाऱ्या अव्वल दोन देशांना संघ कोटा देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तरुणदीप आणि दीपिका चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये होणार सहभागी…
अनुभवी तिरंदाज तरुणदीप रॉय आणि दीपिका कुमारी विक्रमी चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होतील. भारतीय लष्करातील 40 वर्षीय अनुभवी तरुणदीपने 2004 मध्ये अथेन्स ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा देशाचे प्रतिनिधित्व केले होते, तर दीपिकाचे हे सलग चौथे ऑलिम्पिक असेल. 2012 मध्ये लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने पहिल्यांदा भाग घेतला होता. धीरज बोम्मादेवरा, अंकिता भकत आणि भजन कौर हे ऑलिम्पिक पदार्पण करणार आहेत, तर प्रवीण जाधवची टोकियोनंतरची ही सलग दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा असेल.
WTT Contender Lagos 2024 : भारतीय टेबल टेनिसपटू ‘श्रीजा अकुला’चे ऐतिहासिक सुवर्णपदक…
भारतीय संघ पुढीलप्रमाणे…
पुरुष : तरुणदीप राय, धीरज बोम्मादेवरा आणि प्रवीण जाधव.
महिला : दीपिका कुमारी, भजन कौर आणि अंकिता भकत.





