Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकसाठी पात्र होऊनही आभा कठुआला वगळले..! जाणून घ्या, कारण….

Paris Olympics 2024 : – ऑलिम्पिक २०२४ साठी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने(आयओसी) भारतीय खेळाडूंची यादी जाहीर केली. भारताचा ३० खेळाडूंचा अँथलेटिक्स संघ पॅरिसला जाणार होता. मात्र, आता ही संख्या २९ वर आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकला जाणाऱ्या संघात गोळाफेक अँथलीट आभा कठुआचे नाव नाही. आयओसी अथवा अँथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने अद्याप याचे कारणही दिलेले नाही. टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त असल्याने आभाला संघातून वगळण्यात आल्याचे सुत्रांच्या माहितीनुसार म्हटले जात आहे.
मे महिन्यात झालेल्या फेडरेशन कपमध्ये आभाने १८.४१ मीटर थ्रो करत करून राष्ट्रीय विक्रम केला होता. रोड टू पॅरिस रँकिंगमध्ये ती २१ व्या स्थानावर होती आणि अशा प्रकारे पॅरिस ऑलिम्पिकसाठीही तिने पात्रता मिळवली होती. मात्र, शेवटच्या क्षणी तिचे नाव काढून टाकण्यात आले आहे.
अहवालानुसार, लैंगिक विकास नियमन (डीएसडी) उल्लंघनाच्या फरकामुळे जागतिक अँथलेटिक्सने आभाला सहभागी होण्यापासून प्रतिबंधित केले आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रानुसार, आभाचे नाव डोपिंगमुळे नाही तर डीएसडी रेग्युलेशनमुळे काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.





