Paris Olympics 2024 (Badminton) : लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व फेरीत धडक, देशबांधव प्रणॉयला केलं पराभूत…

Paris Olympics 2024 (Badminton,Prannoy H. S. vs L. Sen) : पॅरिस ऑलिम्पिकचा सहावा दिवस भारतासाठी खूप संस्मरणीय ठरला आहे कारण, लक्ष्य सेनने त्याचाच सहकारी एच.एस. प्रणॉयचा पराभव करून पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या उपांत्यपूर्व फेरीत (Quarter-finals) स्थान मिळवले आहे. भारतीय बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेनने उप-उपांत्यपूर्व फेरीत एस.एस. प्रणॉयचा 21-12, 21-06 असा पराभव करत आगेकूच केली आहे.
आता, उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लक्ष्य सेनसमोर चायनीज तैपेईच्या ‘चोउ टिएन चेन’ (Chou Tien-chen) याचे आव्हान असणार आहे. हा सामना शुक्रवारी(2 आॅगस्ट) सांयकाळी 6.30 वाजता सुरू होईल.
ऑलिम्पिक इतिहासात भारतीय खेळाडू बॅडमिंटनमध्ये आमने-सामने येण्याची ही पहिलीच वेळ होती. 22 वर्षीय लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा पराभव करत तर एच.एस. प्रणॉयने व्हिएतनामचा शटलर डक फाट लीचा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.
🇮🇳 Result Update: Men’s Singles #Badminton Round of 16 👇
‘Sen’-sational Lakshya marches on! #TeamIndia’s star shuttler 🏸 qualifies for the QF in his maiden appearance at #ParisOlympics2024. @lakshya_sen defeats fellow countryman🤝🏻@PRANNOYHSPRI in the last 1️⃣6️⃣ match to… pic.twitter.com/9Yv38Vkgt4
— SAI Media (@Media_SAI) August 1, 2024
सामन्यादरम्यान प्रशिक्षकासाठी राखीव असलेली जागा राहिली रिक्त…
लक्ष्य सेन आणि एच.एस. प्रणॉय यांच्यातील सामना पाहण्यासाठी भारतीय प्रशिक्षक आले नाहीत. त्यामुळे बॅडमिंटन कोर्टच्या शेजारी प्रशिक्षकासाठी राखीव असलेली जागा रिक्त राहिली. त्याचे कारण सांगण्याची गरज नाही. आपलेच दोन खेळाडू आमनेसामने असतात, तेव्हा कोणाला सल्ला द्यायचा किंवा कोणासाठी रणनीती आखायची. म्हणून भारतीय प्रशिक्षकाने दोन्ही खेळाडूंचा सामनाच पाहण्याचे टाळले.
Paris Olympics 2024 (Badminton) : चिराग-सात्विक जोडीचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले …
दोन्ही खेळाडूंच्या चांगल्या फटक्यांवर टाळ्यांचा कडकडाट….
हा असा सामना होता ज्यात भारतीय क्रीडाप्रेमी कोणाच्याही बाजूने स्वतःला दाखवू शकले नाहीत. त्यामुळे दोन्ही खेळाडूंच्या चांगल्या फटक्यांवर टाळ्यांचा कडकडाट झाला.
लक्ष्यकडून विजयाचा आनंदोत्सव नाही…
जोडीदाराशी स्पर्धा असताना विजय कसा साजरा करायचा? म्हणून लक्ष्य सेनने जिंकल्यानंतर कोणत्याही प्रकारे आनंदोत्सव साजरा केला नाही. त्याने सहज आपले रॅकेट वर केले आणि डोके खाली करून प्रेक्षकांना अभिवादन केले. त्यानंतर लक्ष्यने एस.एच. प्रणॉय याच्याशी हस्तांदोलन करून त्याला मिठी मारली आणि कोर्टातून बाहेर निघून गेला.





