Paris Olympics 2024 (Boxing) : लवलिनानंतर निशांतची उपांत्यपूर्व फेरीत धडक, दोघेही पदकापासून एक विजय दूर…

Paris Olympics 2024 (Men’s Boxing71kg, Round of 16) : भारताचा स्टार बॉक्सर निशांत देवने चमकदार कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बुधवारी मध्यरात्री 12.34 वाजता झालेल्या पुरुषांच्या 71 किलो वजनी गटाच्या राऊंड ऑफ 16 फेरीत भारतीय बॉक्सर (मुष्टियोद्धा) निशांत देवने सातव्या मानांकित इक्वेडोरच्या जोस गॅब्रिएल रॉड्रिग्ज टेनोरिओचा पराभव केला. निशांतने हा चुरशीचा सामना 3-2 असा जिंकला.
दोन वेळचा राष्ट्रीय चॅम्पियन निशांत देव त्याच्या पदार्पणाच्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला असून आता तो ऑलिम्पिकमधील पहिले पदक मिळवण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. पुढची लढत जिंकताच त्याच्या नावावर किमान कांस्यपदक निश्चित होईल. गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर निशांत देवला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.
Result Update: Men’s #Boxing🥊 71kg, Round of 16👇🏻@nishantdevjr does it💪🏻😎
The 23-year-old boxer defeats Ecuador’s Jose Gabriel Rodriguez Tenorio with a powerful performance as he wins 3-2 by split decision.
Nishant will now head over to the QF😍
Make your predictions… pic.twitter.com/a2obb1FahQ
— SAI Media (@Media_SAI) July 31, 2024
उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना मेक्सिकोच्या पॅन अमेरिका गेम्स चॅम्पियन मार्को व्हर्डेशी होईल. ही लढत रविवारी(4 आॅगस्ट) मध्यरात्री 12.18 वाजता होईल.
लव्हलिना पदकापासून एकच विजय दूर…
दरम्यान, याआधी टोकियो ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती लव्हलिना बोरगोहेन (75 किलो) हिने तिच्या पहिल्या सामन्यात नॉर्वेच्या सुनिव्हा हॉफस्टॅडचा 5-0 ने पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना रविवारी (4 आॅगस्ट) दुपारी 3 वाजता होईल. उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर अव्वल मानांकित चीनच्या ली कियान हिचे आव्हान असेल. या सामन्यातील विजय लव्हलिनासाठी किमान कांस्य पदक निश्चित करेल.





