Paris Olympics 2024 (Badminton) : पी.व्ही. सिंधूनंतर प्रणॉयचीही विजयी सलामी…

Paris Olympics 2024 (Badminton) : भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने चमकदार कामगिरी करत गट टप्प्यातील पहिला सामना जिंकत आगेकूच केली आहे. त्याने जर्मनीच्या फॅबियन रॉथचा 21-18 आणि 21-12 असा पराभव करत रोमहर्षक विजयाची नोंद केली. प्रणॉय आता बुधवारी (31 जुलै) त्याच्या अंतिम गट टप्प्यातील लढतीत जागतिक क्रमवारीत 71व्या क्रमांकावर असलेल्या व्हिएतनामच्या ले डूक फाटशी भिडणार आहे.
🇮🇳 Update: Badminton 🏸 Men’s Singles Group Stage Match👇
Take a bow @PRANNOYHSPRI! You beauty😍
The⭐star shuttler begins his 🇫🇷 #ParisOlympics2024 campaign on a superb note as he defeats Germany’s Fabian Roth by 21-18, 21-12 pic.twitter.com/EP8rmXIpBB
— SAI Media (@Media_SAI) July 28, 2024
पीव्ही सिंधूचीही विजयी सलामी
दुसरीकडे, दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने महिला एकेरी ग्रुप स्टेजमधील पहिल्या सामन्यात मालदीवच्या फातिमथ नब्बा अब्दुल रझाकविरुद्ध विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. सिंधूने पहिला गेम 21-9 असा जिंकला तर दुसरा गेम 21-6 ने जिंकला. सिंधूने अवघ्या 27 मिनिटांत हा सामना संपवला.
सिंधूने 2016 रिओ ऑलिम्पिक आणि 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकली होती. आता या अनुभवी खेळाडूकडून हॅट्ट्रिकची अपेक्षा आहे. आता सिंधूचा पुढील सामना 31 जुलै रोजी दुपारी 12.50 वाजता सुरू होईल. दुसऱ्या गट सामन्यात सिंधूपुढे एस्टोनियाच्या क्रिस्टिन कुबाचे आव्हान असेल. जर सिंधूने हा सामना जिंकला तर ती प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचेल.





