Paris Olympics 2024 (Badminton) : लक्ष्य सेनचं पदकाचे स्वप्न भंगलं, कांस्यपदकाच्या लढतीत पराभवाचा धक्का….

Paris Olympics 2024 (Badminton) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताचा 10वा दिवस आहे आणि बॅडमिंटनमधून भारतीय चाहत्यासाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. भारताच्या लक्ष्य सेनला बॅडमिंटन एकेरीच्या कांस्यपदकाच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. लक्ष्य सेनने पहिला गेम सहज जिंकला होता, पण मलेशियाच्या ली जी जियाने दुसरा आणि तिसरा गेम जिंकून भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का दिला. मलेशियाच्या ली जी जियाने लक्ष्यचा 13-21, 21-16 आणि 21-11 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले आहे.
🇮🇳 Result Update: #Badminton Men’s Singles Bronze Medal Match👇
So close, yet so far💔
Our star Shuttler Lakshya Sen suffers heartbreak in his first-ever medal match at the #Olympics.
The 22-year-old, who made his debut appearance at #Paris2024, had nothing less than a dream… pic.twitter.com/skEIjHCdNQ
— SAI Media (@Media_SAI) August 5, 2024
भारतीय शटलरने पहिला गेम 21-13 असा सहज जिंकला होता. यानंतर दुसऱ्या गेममध्ये एका टप्प्यावर लक्ष्यने 8-2 अशी आघाडी घेतली होती. मात्र, यानंतर मलेशियाच्या खेळाडूने जोरदार पुनरागमन करत 11-8 ने आघाडी घेतल्यानंतर दुसरा गेम 21-16 असा जिंकला. यानंतर ली जियाने तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये पूर्णपणे वर्चस्व राखले आणि तिसरा गेम 21-11 असा जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले आणि सामन्यासोबतच त्याने कांस्यपदकही पटकावले. लक्ष्यने सामन्यात अनेक अनफोर्स चुका केल्या आणि मलेशियाच्या खेळाडूला स्मॅशनंतर स्मॅश मारण्याची संधी दिली. या पराभवासह इतिहास रचण्याची त्यांची संधी हुकली आहे.
दरम्यान, याआधी भारताचा शटलर लक्ष्य सेन आणि गत ऑलिम्पिक चॅम्पियन डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसेन यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला होता. या उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्यला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्याआधी अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत लक्ष्य सेनने चायनीज तैतेईच्या चोयू टिएन चेन याला 19-21, 21-15, 21-12 असे पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला होता आणि यासह बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. लक्ष्यपूर्वी किदाम्बी श्रीकांत (ऑलिम्पिक 2016) आणि पारुपल्ली कश्यप (ऑलिम्पिक 2012) यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.





