परिणीती चोप्राने प्रेग्नेंसीच्या चर्चांवर ‘मौन’ तोडले

Parineeti Chopra । परिणीती चोप्रा नुकतीच विमानतळावर पफर जॅकेट घातलेली दिसली आणि तेव्हापासून ती प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली. तिने सप्टेंबर २०२३ मध्ये राघव चढ्ढासोबत लग्न केले. यानंतर अनेकदा ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या दिसतात.
‘चमकिला’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचमध्ये दिलजीत दोसांझ आणि दिग्दर्शक इम्तियाज अलीसोबत परिणीती काळ्या कफ्तान ड्रेसमध्ये पोहोचली होती, ज्यानंतर पुन्हा एकदा ती गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चांवर तिने मजेदार पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्रीने आता या अफवांचे अत्यंत गमतीशीरपणे खंडन केले आहे. परिणीतीने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली ज्यामध्ये तिने हसणारे इमोजीसह शेअर करत आहे, ‘काफ्तान ड्रेस = गर्भधारणा, ओव्हरसाइज शर्ट = गर्भधारणा, आरामदायक कुर्ता = गर्भधारणा.”
दरम्यान, चित्रपटाच्या कलाकार आणि क्रूने अमर सिंह चमकीला आणि त्यांची पत्नी अमरजोत चमकीला यांच्या जीवनावर आधारित ‘चमकिला’चा ट्रेलर लॉन्च केला. दिलजीत आणि परिणीती या दोघांनीही काही पंजाबी गाण्यांना आवाज दिला आहे. ए आर रहमानने त्याला संगीत दिले आहे. अमरजोतच्या पात्रात येण्यासाठी परिणीतीने 15 किलो वजनही वाढवले होते.
‘चमकिला’ला पंजाबचा एल्विस प्रेस्ली म्हणत. दुर्दैवाने, एका परफॉर्मन्सची तयारी करत असताना, पंजाबमधील मेहसमपूरमध्ये तो आणि त्याची पत्नी अमरजोत यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याने चमकिलाचे आयुष्य संपले. दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी घटनास्थळावरून त्वरीत पलायन केले असून या प्रकरणाचा अद्यापही उलगडा झालेला नाही. हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.





