Priyanka Chopra On Raghav Chadha : राघव चढ्ढा यांना प्रियंका चोप्राचा पाठिंबा…
Priyanka Chopra On Raghav Chadha : प्रियांका चोप्राने मेहुणा राघव चढ्ढा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

Priyanka Chopra On Raghav Chadha : आम आदमी पार्टीने खासदार राघव चढ्ढा यांना उपनेते पदावरून हटवल्यानंतर अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आता राघव चढ्ढा यांच्या जागी अशोक मित्तल हे राज्यसभेत आम आदमी पार्टीचे प्रतिनिधित्व करणारे उपनेते असतील.
याशिवाय आम आदमी पार्टीने राज्यसभा सचिवालयाला संसदेत बोलण्यासाठी राघव चढ्ढा यांना कोणताही वेळ दिला जाऊ नये, असे सांगितले आहे. ‘आप’च्या या निर्णयानंतर, अनेक लोकांनी राघव चढ्ढा यांना पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना, राघव यांनी इन्स्टाग्राम एक व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शन दिली की, “मला शांत करण्यात आले आहे, पण माझा पराभव झालेला नाही. आम आदमीसाठी माझा संदेश.”
View this post on Instagram
यानंतर आता प्रियांका चोप्राने मेहुणा राघव चढ्ढा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. राघव चढ्ढा यांचे लग्न अभिनेत्री परिणीती चोप्राशी झाला आहे. जी प्रियांका चोप्राची चुलत बहीण आहे.
राघव यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, प्रियांका चोप्राने कमेंट्समध्ये टाळ्या आणि हृदयाचे इमोजी वापरून आपला पाठिंबा दिला. तिची ही छोटीशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली असून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हेही वाचा:





