Parineeti Chopra : अभिनेत्री परिणीती चोप्राची पतीसाठी खास पोस्ट; व्हिडिओ शेअर करत म्हणाली “…तर तो आपल्यासाठी एक मोठा विजय असेल”
Parineeti Chopra :अभिनेत्री परिणिती चोप्राने पतीसाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावरुन शेअर केली आहे.

Parineeti Chopra : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra ) शेवटची 2024 मध्ये दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या ‘अमर सिंह चमकिला’ या वेबसिरीजमध्ये दिलजीत दोसांझसोबत झळकली होती. सध्या ती आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
तिचे पती राघव चड्ढा यांनी राज्यसभेत पितृत्व रजेचा (Paternity Leave) महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. यावर परिणीती चोप्राने आपल्या पतीचे मनापासून कौतुक केले आहे. Parineeti Chopra
परिणीतीने राघव चड्ढा यांचा संसदेमधील या विषयावर भाषणाचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आणि एक भावनिक संदेश लिहिला आहे. “माझ्या प्रिय पती, आज तुम्हाला संसदेत केवळ एक खासदार म्हणून नव्हे, तर आपल्या मुलाचे वडील म्हणून बोलताना पाहणे हा एक खूप खास क्षण होता. तुम्ही अगदी त्याच वडिलांसारखे बोललात ज्यांना मी रोज पाहते.”
View this post on Instagram
परिणीतीचे भावनिक विधान Parineeti Chopra
परिणीती चोप्रा पुढे म्हणाली, “आपल्या मुलाला दोन्ही पालकांचे पूर्ण हक्क मिळावेत, यावर आपण अनेकदा चर्चा केली आहे. पितृत्व रजा हे केवळ एक धोरण नाही, तर ती आपल्या मुलाचे संगोपन करण्याची एक पद्धत आहे. जेव्हा मुलाचा जन्म होतो, तेव्हा केवळ आईच नाही, तर वडीलही जन्माला येतात.”
पतीसाठी कौतुकाचे उद्गार Parineeti Chopra

Parineeti Chopra : अभिनेत्री परिणीती चोप्राची पतीसाठी खास पोस्ट; व्हिडिओ शेअर करत म्हणाली “…तर तो आपल्यासाठी एक मोठा विजय असेल”
“अनेक माता ही जबाबदारी कोणत्याही आधाराशिवाय एकट्याच उचलतात. आज तुम्ही संसदेत त्यांचा आवाज उठवला. जर यामुळे काही माता-पित्यांना थोडासा जरी आधार मिळाला, तर तो आपल्यासाठी एक मोठा विजय असेल. एक चांगले वडील आणि एक चांगले नेते असल्याबद्दल धन्यवाद. मला तुमचा नेहमीच अभिमान वाटतो.” असे कौतुकाचे उद्गार परिणीतीने पतीसाठी काढले आहेत.





