Raghav Chadha Wealth: राघव चड्ढा (Raghav Chadha) यांना आम आदमी पार्टी (AAP) ने राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले आहे. गुरुवारी (2 एप्रिल 2026) पक्षाने राज्यसभा सचिवालयाला पत्र पाठवून त्यांच्या जागी अशोक मित्तल (Ashok Mittal) यांची नियुक्ती करण्याची माहिती दिली. राघव चड्ढा यांची 2023 मध्ये संजय सिंग (Sanjay Singh) यांच्या जागी उपनेतेपदी नियुक्ती झाली होती. या निर्णयानंतर त्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून, पक्षाकडून या मुद्द्यावर सातत्याने पलटवार केला जात आहे. राघव चड्ढा यांची एकूण संपत्ती – निवडणूक शपथपत्रानुसार, राघव चड्ढा यांची एकूण मालमत्ता सुमारे 36 लाख रुपये आहे. काही माध्यमांमध्ये ही रक्कम 50 लाख रुपये असल्याचेही सांगितले जाते. *विविध बँक खात्यांमध्ये सुमारे 15 लाख रुपये जमा *शेअर्स, बॉण्ड्स आणि डिबेंचर्समध्ये 6 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक *एलआयसी (LIC) पॉलिसीची किंमत सुमारे 52 हजार रुपये हेही वाचा – जन विश्वास विधेयक 2026 मंजूर! छोट्या चुका आता गुन्हा नाहीत सोने, वाहन आणि इतर मालमत्ता – *सुमारे 90 ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत सध्याच्या दरानुसार 13-14 लाख रुपये *Maruti Swift Dzire कार *स्थावर मालमत्ता नाही काही अहवालांमध्ये मात्र त्यांच्या नावावर दिल्लीत घर असल्याचेही नमूद केले आहे. परिणीती चोप्राची संपत्ती – राघव चड्ढा यांची पत्नी परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) ही यशस्वी अभिनेत्री असून तिची एकूण संपत्ती सुमारे 74 कोटी रुपये आहे. *मुंबईतील बांद्रा येथे सुमारे 22 कोटींचे आलिशान घर महागड्या गाड्यांचा ताफा : *Range Rover Vogue (1.30 कोटी रुपये) *Audi Q4 (43.19 लाख रुपये) *Audi Q7 (69.27 लाख रुपये) दरम्यान, राजकारणात सक्रिय असलेले राघव चड्ढा यांची वैयक्तिक संपत्ती तुलनेने मर्यादित आहे, तर त्यांच्या पत्नी परिणीती चोप्रा ही बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री असल्याने आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. दरम्यान, ‘आप’च्या या निर्णयामुळे राघव चड्ढा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.