Parbhani News : परभणीत ड्रग्ज प्रकरणी आणखी ६ जणांना अटक
Parbhani News : जिल्ह्यातील मानवत शहरात एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाच्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईला आता मोठे यश मिळाले

Parbhani News : जिल्ह्यातील मानवत शहरात एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाच्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईला आता मोठे यश मिळाले असून २६ जुलै रोजी ७३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करून दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्या कसून चौकशीतून आणखी ६ आरोपींची नावे समोर आली. (Parbhani News)
त्यानुसार पोलिसांनी ८ ऑगस्ट रोजी रात्री कारवाई करत ६ जणांना अटक केली असता न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपींना न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता ८ पोहोचली आहे. (Parbhani News)
मानवत तालुक्यातील रत्नापूर शिवारात २६ जुलै रोजी पोलिसांनी एमडी ड्रग्जची कारवाई करून ७३ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केला होता. या वेळी दोघांना अटक करण्यात आली होती. सखोल चौकशीत अमली पदार्थाच्या पुरवठा साखळीतील आणखी व्यक्तींची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली. (Parbhani News)
या तपासातून परळी, लातूर आणि कळंबपर्यंत ड्रग्जच्या व्यवहाराचे धागेदोरे जोडले जात असल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि मानवत पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची भूमिका, त्यांनी अमली पदार्थ कोठून मिळवला, कोणाला पुरवठा केला तसेच या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. (Parbhani News)





