Paris Paralympics 2024 : मनीषा पाठोपाठ नित्या सिवनही उपांत्य फेरीत दाखल….

Paris Paralympics 2024 (ParaBadminton Women’s Singles SH6 QF) : पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताच्या मनीषा रामदास पाठोपाठ नित्या श्री सिवन हिने सुध्दा उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे.
भारताची पॅरा बॅडमिंटनपटू नित्या श्री सिवनने एसएच6 (SH6) प्रकारात चमकदार कामगिरी केली आहे. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामना जिंकून तिने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. नित्याने पोलंडच्या ऑलिव्हियाचा 21-4, 21-7 असा पराभव केला आहे. आता तिचा पुढील सामना चीनच्या लिन एस हिच्याशी होईल. हा सामना सोमवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12.20 वाजता सुरू होईल.
🇮🇳 Result Update: #ParaBadminton🏸 Women’s Singles SH6 QF
Nithya Sre advances to the Semis😍
Nithya secures a dominating victory against Poland’s Oliwia Szmigiel 2-0 with a scoreline of 21-4 & 21-7🥳
Up ⏭️: SF against China’s Lin S to book a place in the final
Let’s… pic.twitter.com/bHmmmSUK9A
— SAI Media (@Media_SAI) September 1, 2024
दरम्यान, तिच्याआधी अन्य भारतीय बॅडमिंटनपटू मनीषा रामदास हिने एसयू5 (SU5) प्रकारात महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठून पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. उपांत्यपूर्व फेरीत मनीषा रामदास हिने जपानच्या मामिको टोयोडाला 21- 13, 21-16 असे पराभूत करत आगेकूच केली.
US Open 2024 : बोपन्ना-सुत्जियादी मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत…
दुसरीकडे अन्य भारतीय बॅडमिंटनपटू मनदीप कौर आणि पलक कोहली यांनी रविवारी महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आपापल्या लढती गमावल्याने त्यांचे पॅरालिम्पिक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.





