Paper Leak : झारखंडमध्ये पेपर लीक नाही तर पेपर लुटालूट; भाजपचा काँग्रेससह राहुल गांधींवर निशाणा
झारखंडमध्ये सहाय्यक वनसंरक्षक आणि वनक्षेत्रपाल भरती परीक्षांमध्ये (Paper Leak) झालेल्या कथित गैरव्यवहारावरून भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Paper Leak : झारखंडमध्ये सहाय्यक वनसंरक्षक आणि वनक्षेत्रपाल भरती परीक्षांमध्ये (Paper Leak) झालेल्या कथित गैरव्यवहारावरून भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. झारखंडमध्ये हा पेपर लीकचा प्रकार नसून थेट पेपर लुटालूट आहे, असा गंभीर आरोप भाजपने शनिवारी केला.
नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितले की, झारखंड लोकसेवा आयोगाने (Paper Leak) केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. परीक्षा घेतल्यानंतर ज्या स्ट्रॉंग रूममध्ये उत्तरपत्रिका ठेवण्यात आल्या होत्या, तिथे दरोडा टाकून उत्तरपत्रिकांमध्ये थेट फेरफार करण्यात आला.
ही केवळ पेपर फुटीची घटना नसून सरळ सरळ पेपर लुटण्याचा प्रकार आहे, असा दावा त्रिवेदी यांनी केला. काँग्रेस हा झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा प्रणीत आघाडी सरकारचा महत्त्वाचा घटक पक्ष आहे. यावरून राहुल गांधींना घेरताना त्रिवेदी म्हणाले, या लुटालूटीची सूट कोणी दिली, याचे उत्तर राहुल गांधींनी देशवासीयांना दिले पाहिजे.
कारण त्यांच्या पक्षातील अनेक नेते झारखंड सरकारमध्ये (Paper Leak) महत्त्वाच्या मंत्रीपदांवर आहेत. दिल्लीत परीक्षांच्या मुद्द्यावरून गदारोळ करणारे विरोधी पक्षांचे नेते आता या प्रकरणावर मौन बाळगून आहेत, असा आरोप करत त्रिवेदी यांनी आघाडीतील मित्रपक्षांना राहुल गांधींचे तीन माकड बनल्याची उपरोधिक टिप्पणी केली.






