Jharkhand Student Protest : झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; सरकारकडून TDPL व JSSC-CGL परीक्षा रद्द, घोटाळ्यांची होणार चौकशी
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनापुढे झुकत सोरेन सरकारने TDPL आणि JSSC-CGL परीक्षांसह सर्व नियुक्त्या रद्द केल्या आहेत. 2014 पासूनच्या सर्व परीक्षांमधील गैरव्यवहारांची चौकशी होणार आहे.

Jharkhand Student Protest : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि भरती प्रक्रियेविरोधात सुरू असलेल्या तीव्र विद्यार्थी आंदोलनापुढे अखेर हेमंत सोरेन सरकारने माघार घेतली आहे. राज्य मंत्रिमंडळाने TDPL मार्फत घेतलेल्या सर्व परीक्षा, जाहीर निकाल आणि उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासोबतच वादग्रस्त ठरलेली JSSC-CGL परीक्षाही पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
Delhi: On the Jharkhand student protest, BJP spokesperson RP Singh says, “The students’ only demand is that the entire matter should be investigated by the CBI. All the recruitments conducted so far should be cancelled, and the recruitment process should be started afresh. They… pic.twitter.com/XIIgU8u2ZU
— IANS (@ians_india) August 17, 2026
TDPL अंतर्गत झालेली सर्व भरती प्रक्रिया रद्द
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जाहीर केले की, TDPL च्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या सर्व परीक्षा, निकाल आणि निवड प्रक्रियेचा फेरविचार करून ती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. यामुळे आता भरती प्रक्रियेबाबत नव्याने निर्णय घेतला जाणार आहे.
#WATCH | Ranchi, Jharkhand: JPSC-JSSC aspirants get emotional as they celebrate after the state government accepted their demands. The JSSC CGL exam and all exams conducted on behalf of TDPL have been cancelled. pic.twitter.com/u34jcsShxA
— ANI (@ANI) August 17, 2026
२०१४ पासूनच्या सर्व प्रकरणांची चौकशी
राज्य सरकार केवळ चालू प्रकरणापुरती मर्यादित न राहता, २०१४ पासून आतापर्यंत झालेल्या परीक्षांमधील सर्व लहान-मोठ्या गैरव्यवहारांची सखोल चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणि निष्पक्षता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
#WATCH | Ranchi: Jharkhand CM Hemant Soren says, “Today, the Cabinet decided to cancel the JSSC-CGL examinations as well. Furthermore, a comprehensive inquiry will be conducted into all errors—minor or major—that have occurred since 2014. We will also soon convene to discuss the… pic.twitter.com/9jnEdbUaHx
— ANI (@ANI) August 17, 2026
विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण; विरोधकांकडून CBI चौकशीची मागणी
शासनाच्या या निर्णयानंतर रांचीमध्ये JPSC आणि JSSC च्या हजारो आंदोलक विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला असून या निर्णयाला आपल्या लढ्याचा मोठा विजय म्हटले आहे. दुसरीकडे, भाजप प्रवक्ते आर. पी. सिंह यांनी आरोप केला की विद्यार्थ्यांची मुख्य मागणी CBI चौकशीची आहे; मात्र मोठे चेहरे समोर येतील या भीतीने सरकार या प्रकरणाची सीबीआय चौकशी टाळत आहे.





