“राष्ट्रवादी’कडून अधिकाऱ्यांना कागदी होड्या

येरवडा – गुंजन टॉकीज चौक ते गोल्फ या रस्त्यावर गुडघ्या एवढे पाणी साचत असून पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नसल्याने पावसाळ्यात येरवडा प्रभाग क्र. 6 मधील नागरिकांना क्षेत्रीय कार्यालयाने होड्या द्याव्यात, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आली. यावेळी
यावेळी सहाय्यक आयुक्तांना प्रतीकात्मक कागदी होड्याही देण्यात आल्या.
येरवडा व परिसरातील प्रमुख रस्त्यांची झालेली दुरवस्था, रस्त्यावर साचणारे पाणी, त्यामुळे वाहनचालक व नागरिकांची होणारी हेळसांड त्याचप्रमाणे पावसाळी वाहिन्या, सांडपाण्याच्या वाहिन्या सार्वजनिक स्वच्छता व शौचालय त्यांची दुरुस्ती तसेच इतर अनेक प्रलंबित समस्या संदर्भात येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख महापालिका सहाय्यक आयुक्त यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शैलेश राजगुरू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सदरच्या समस्यांवर आगामी आठ दिवसांत उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष ऍड. नानासाहेब नलावडे, पक्षाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब खंडागळे,
युवती कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष अश्विनी परेरा, उपाध्यक्ष अक्षता राजगुरू, डॉ. राजू अडागळे, अक्षय शेलार, प्रशांत खंडागळे, जावेद इनामदार, रुपेश गायकवाड, शैलेंद्र शिंदे, राहुल पवार, अभिलाष कांबळे, अक्षय जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी येरवडा प्रभागातील विविध नागरी समस्यांच्या संदर्भात महापालिका क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.





