बीडमध्ये पंकजा मुंडेना धक्का; कट्टर समर्थक सोडणार भाजपची साथ; पिता-पुत्रांचा अजित पवार गटात प्रवेश
Pankaja Munde | बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सध्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कट्टर समर्थकांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबत सावलीप्रमाणे उभे राहिलेले राजाभाऊ मुंडे आणि त्यांचा मुलगा बाबरी मुंडे यांनी भाजपला रामराम केला आहे. हे पिता-पुत्र आता बीड जिल्ह्याच्या वडवणी येथे आयोजित मेळाव्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना हा एक पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. महायुती असताना अजित दादांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्याचा निर्णय का घेतला यावर राजाभाऊ मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. Pankaja Munde |
भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागचे सांगितले कारण
राजाभाऊ मुंडे म्हणाले की, ‘बीड जिल्ह्याचा विकास खुंटत जात आहे आणि या जिल्ह्यावर आता अजित पवार यांनी लक्ष घातले आहे म्हणून आम्ही भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या सोबत जात आहे. मला पंकजा मुंडेंबद्दल काही बोलायचे नाही. मी त्यांची साथ सोडून दुसरीकडे जात आहे म्हणून सादा त्यांनी मला फोन देखील केला नाही. आमदार प्रकाश सोळंके हे आमच्या माजलगाव मतदार संघाचे आमदार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जाहीर प्रवेश करत आहोत.’
संघर्षकाळात पक्षासाठी एकनिष्ठेने काम केले. पण पक्ष आणि नेत्यांकडून स्थानिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झालं. न्याय मिळत नसेल, तर अशा पक्षात राहण्यात अर्थ नाही, अशी खदखद बाबरी मुंडे यांनी बोलून दाखवली.
धनंजय मुंडे यांचा फोटो गायब
सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. वडवणी शहरात अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आहे आहे. मात्र या लावलेल्या बॅनरवर मात्र माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो लावण्यात आला नाही. त्याबाबतही राजाभाऊ मुंडे स्पष्टीकरण दिले आहे. जर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनजंय मुंडे असते तर आम्ही त्यांचा ही फोटो या बॅनरवर लावला असता, अशी प्रतिक्रिया यावेळी राजाभाऊ मुंडे यांनी बोलताना दिली. Pankaja Munde |
राजाभाऊ मुंडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे जवळचे सहकारी मानले जातात. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ते पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले. राजाभाऊ मुंडे हे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. बँकेतील आर्थिक अनियमितता प्रकरणी आणि बनावट संस्थाना कर्ज वाटप केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी ते २ वर्षे तुरूंगात होते. Pankaja Munde |
तर, राजाभाऊ मुंडे यांचा मुलगा बाबरी मुंडे हे वडवणी नगरपंचायतीचे माजी नगर अध्यक्ष आहे. बाबरी मुंडे यांनी माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यांना १८००० मते मिळाली होती. दरम्यान, मुंडे पिता-पुत्रांच्या पक्ष प्रवेशामुळे आता बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे. Pankaja Munde |
हेही वाचा :
Samira Reddy : गोवा बनलं समीरा रेड्डीचं मानसिक आरोग्य सुधारण्याचं कारण, अभिनेत्रीची खास पोस्ट चर्चेत




