Pankaja Munde : ‘…..अन्यथा मी पुढील दसरा मेळाव्याला तोंड दाखवणार नाही’; पंकजा मुंडेंचा मोठा निर्धार

Updated On:

Pankaja Munde – दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा बीडमधील भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा (Dasara Melava) पार पडला आहे. येथे मोठ्या संख्येने येथे कार्यकर्ते हजर होते.

दरम्यान, मागील काही वर्षांपासून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजपने राज्याच्या राजकारणातून दूर केल्याचे चित्र दिसून आले आहे. यावर त्यांनी खंत देखील व्यक्त केली.

आता आज सावरगाव येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी भाषण दरम्यान अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी आपल्या मानतील अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत.

भाषणावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या,’ हा आवाज पूर्ण देशात पोहोचला पाहिजे. तुम्हा सर्वांनी उन्हा तान्हात येऊन माझ्या या सीमोल्लघंनासाठी गर्दीचं सीमोल्लंघन केलं, यासाठी तुमचे आभार मानते.

त्या पुढे म्हणाल्या, ‘2019 च्या पराभवानंतर पाच वर्ष झाले, खूप जीव लावला. मध्य प्रदेशमध्ये मरमर काम केलं, परळीमध्ये काम केलं, दुसऱ्या मतदार संघातील लोकांच्या गाठी भेटी घेतल्या.

माझं सरकार होतं, ऊसतोड कामगारांचं महामंडळ माझ्याकडे नव्हतं, निर्णय माझ्याकडे नव्हता. ऊसतोड कामगार कधीच गोपीनाथ मुंडेंचं नाव सोडणार नाहीत.

ऊसतोड कामगारांना राबायचं म्हणून मी सावलीत बसणार नाही, मीही त्यांच्यासोबत राबणार आणि त्यांना न्याय दिल्याशिवाय पुढील दसरा मेळाव्याला तोंड दाखवणार नाही, असं आश्वासनही पंकजा मुंडे यांनी यावेळी दिलं.

त्यांनी पुढे म्हटलं की, ‘मी माझा आणि तुमचा स्वामिमान मरू देणार नाही. मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला अंतर देणार नाही. मी तुम्हाला न्याय देण्यासाठी 2024 पर्यंत मैदानात आहे आणि तुमची इच्छा असेल तर तिथून मला कुणीच हटवू शकणार नाही.’

आणखी संबंधित बातम्या

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

2026-10-06 17:29:48

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

2026-10-06 11:55:05

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

Chandrashekhar Bawankule : "दुष्काळी परिस्थिती गंभीर, कोरोना महामारीपेक्षाही हे मोठे संकट असल्याने उत्सवांवर..."; बावनकुळेंचे आवाहन

2026-10-06 09:38:41

Chandrashekhar Bawankule : "दुष्काळी परिस्थिती गंभीर, कोरोना महामारीपेक्षाही हे मोठे संकट असल्याने उत्सवांवर..."; बावनकुळेंचे आवाहन