“आमचं दसरा मेळाव्याचं उद्दिष्ट…” ; मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

Pankaja Munde on Manoj Jarange । राज्यात आज जवळपास ६ दसरा मेळावे पार पडत आहेत. दरवर्षीप्रमाणे शिवसेना आणि शिंदे गटाचे मेळावे तसेच मनसेचा देखील पार पडणार आहे. त्यासोबतच तिकडे मराठवाड्यात भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे. त्यातच आता यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच नारायण गडावर दसरा मेळावा घेत आहेत.त्यांच्या याच मेळाव्यावर पंकजा मुंडे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आमचं दसरा मेळाव्याचं उद्दिष्ट सिम्मोलंघनापर्यंत मर्यादीत Pankaja Munde on Manoj Jarange ।
पंकजा मुंडे म्हणाल्या, नारायण गडावर मनोज जरांगेंचा आज पहिल्यांदा मेळावा होत आहे. आमचा मेळावा अनेक वर्ष होत आहे, आमचा मेळावा पारंपारिक आहे. मनोज जरांगे काय बोलणार? याची आम्हालाही उत्सुकता आहे. आमचा कार्यक्रम पारंपारिक आहे. आमचा अनेक वर्ष झाले आम्ही करतोय. त्यांचा कार्यक्रम यावर्षी होत आहे. त्यामुळे त्याच्यात काही एकमेकांशी संबंध असण्याचं कारण नाही. माझ्या मेळाव्याला मीडिया कालपासून कव्हर करतोय. माझ्या मेळाव्याला मुस्लिम येणार आहेत, बौद्ध बांधव येणार आहेत. माझ्या मेळाव्याला सर्व जाती धर्माचे लोकं येणार आहे. आमचं दसरा मेळाव्याचं उद्दिष्ट सिम्मोलंघनापर्यंत मर्यादीत आहे.
जे काही बोलायचं नारायण गडावरुन बोलेन Pankaja Munde on Manoj Jarange ।
मनोज जरांगे दसऱ्या मेळाव्याला जाताना म्हणाले, आज विजयादशमीच्या महाराष्ट्रतील जनतेला शुभेच्छा. आत्ता जे काही बोलायचं नारायण गडावरुन बोलेन. सर्वांनी शांततेत यावं आणि जावं. कुणी काही केल्याने आपली एकजूट कमी होत नाही. राज्यातील जनता साडेबारा पर्यंत गडावर पोहोचेल. साडेबारा वाजता मी कार्यक्रम सुरू करेन. जे बोलायचं तिथून बोलेन. तिथे किती लोक येतील हे सांगता येणार नाही. मोजणारे मोजतील मेळाव्याला आम्ही काही तयारी केली नाही. आम्ही गरीब लोक आहोत, मी इथे काहीच सांगणार नाही , असंही मनोज जरांगे यांनी सांगितले.
हेही वाचा
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी तुफान गर्दी; पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात





