मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी तुफान गर्दी; पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे यांचा लढा सुरु आहे. सगेसोयरेंची अधिसूचना लागू करून सरकारने मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी जरांगे यांनी अनेकदा उपोषण केले. मात्र, सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र 10 आरक्षण दिलं आहे. त्यांनी आतापर्यंत जरांगे यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही. यातच आज मनोज जरांगे पाटील बीडमध्ये नारायण गडावर दसरा मेळावा घेणार आहे.
२०० एकरमध्ये वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था
जरांगे यांच्या दसरा मेळाव्याला पहाटेपासूनच गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे. काही जणांनी तर पहाटेपासूनच नारायण गडावर तंबू ठोकला आहे. तब्बल ९०० एकरामध्ये हा मेळावा होणार असून २०० एकरमध्ये वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मेळाव्याला येणाऱ्या मराठा बांधवांसाठी चहा आणि नाष्ट्याची सोय देखील करण्यात आली आहे.
हजारो मराठा बांधव नारायण गडावर दाखल
नारायण गडाकडे येणाऱ्या मराठ्यांनी शांततेत यावं, आपापली एकजूट कमी होत नाही, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. आज नारायण गडावर दुपारी १ वाजेच्या सुमारास जरांगे यांचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी आतापर्यंत हजारो मराठा बांधव नारायण गडावर दाखल झाले आहेत.
थोड्याच वेळात मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या मेळाव्याला लाखोंची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आजच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जरांगे कोणती मोठी घोषणा करणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
हेही वाचा:
“आमचं दसरा मेळाव्याचं उद्दिष्ट…” ; मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया




