“…पण मला बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर बीडची…” ; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली सल

Pankaja Munde on Guardian Minister । राज्यात महायुती सरकारकडून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र या यादीने राज्यात नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. बीडच्या पालकमंत्रीपदापासून धनंजय मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे. म”ला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालं आहे. त्यात मी सुखी आहे. पण मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर मला आनंद झाला असता. “असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
मला मिळालेली संधी माझ्यासाठी अनुभव Pankaja Munde on Guardian Minister ।
सोमवारी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन नाराजी निर्माण झाली होती. फार बोलण्यास नकार दिला. या स्थगिती यासंदर्भात मला काही माहिती नाही, मी बोलणार नाही,” असे म्हटले. तसेच “मी माझ्या खात्याशी संबंधित पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी आज नागपूरला आली आहे. बीडच्या पालकमंत्री पदाबाबत मी अगोदरच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मला जालना येथील पालकमंत्री पद मिळाले. त्या ठिकाणाहून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मला मिळालेली संधी माझ्यासाठी अनुभव आहे, असं समजून मी पुढे वाटचाल करत असते. प्रत्येकवेळी तुम्हाला सारखं काम करायला मिळेल असं नाही. तर मी पूर्वी पाच वर्षे कोणत्याही पदावर नसताना पूर्ण वेळ संघटनेचे काम केले, ” असे पंकजा मुंडे यांनी सांगितली.
बीडचं पालकमंत्रीपद न मिळण्याचे मनात दुःख ? Pankaja Munde on Guardian Minister ।
पुढे बोलताना त्यांनी,”मी बीडची मुलगी असल्याने जर मला बीडच पालकमंत्री पद मिळालं असतं तर बीडची सेवा करण्याची संधी मला मिळाली असती तर आणखी आनंद झाला असता. माझा पाच वर्षातील कार्यकाळ बीडसाठी सर्वाधिक विकसनशील कार्यकाळ राहिला आहे. आता झालेल्या निर्णयाला कोणतीही असहमती न दर्शविता मिळालेल्या संधीला जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या कार्यकाळात बीडचा विकास झाला होता, असे सांगत बीडच्या पालकमंत्रिपदावर आपला ठाम दावा होता, “असे पंकजा मुंडे यांच्याकडून अप्रत्यक्षपणे सांगण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
तसेच,”जालना जिल्ह्यात मला डबल लक्ष द्यावे लागेल. बीडचे पालकमंत्री अजितदादा आहेत. ते आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा मला विश्वास आहे. कोण कोणाला काय म्हणाले यावर मी कधीच बोलत नाही. माझ्या भूमिकेवर मी बोलू शकेन”, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.





