Pandavani Singer Teejan Bai: पांडवानी गायिका तीजन बाई काळाच्या पडद्याआड; स्त्री असल्यामुळे विरोध, १० रुपये मानधन अन्…
Pandavani Singer Teejan Bai: पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या लोकगायिका

Pandavani Singer Teejan Bai: पद्मविभूषण पुरस्कार विजेती महान पांडवानी गायिका तीजन बाई यांचे रविवारी एम्स रायपूर येथे निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. त्या भारतातील सर्वात आदरणीय लोककलाकारांपैकी एक होत्या.
त्यांनी छत्तीसगडची पारंपरिक कथाकथनकला, पांडवाणी, जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनाने भारतीय लोकसंगीत आणि संस्कृतीच्या एका युगाचा अंत झाला आहे. तिन्ही पद्म पुरस्कार मिळवणाऱ्या त्या मोजक्या लोककलाकारांपैकी एक बनल्या.
२७ मे रोजी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तीजन बाई यांची प्रकृती सुधारत होती. पण गेल्या तीन दिवसांत त्यांची प्रकृती खालवली आणि त्यांचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत नव्हते.
तीजन बाई या भारतातील सर्वात प्रसिद्ध लोकगायिकांपैकी एक आणि छत्तीसगडची पारंपरिक कथाकथन कला असलेल्या पांडवानीचा सर्वात मोठा चेहरा होत्या. गायन, नाट्यमय कथन आणि साध्या वाद्यांच्या माध्यमातून त्यांनी भारतातील आणि जगभरातील प्रेक्षकांसाठी महाभारतातील कथा जिवंत केल्या.
तीजन बाई यांचा जीवन प्रवास
तीजन बाई यांचा जन्म ८ ऑगस्ट १९५६ रोजी सध्याच्या छत्तीसगडमधील भिलाईजवळच्या गनियारी गावात झाला. त्या पारधी अनुसूचित जमातीच्या होत्या. लहानपणी, त्यांनी आपले आजोबा, ब्रिजलाल पारधी यांच्याकडून महाभारतातील कथा ऐकून शिकल्या. नंतर त्यांनी उमेद सिंग देशमुख यांच्याकडून अनौपचारिक प्रशिक्षण घेतले.
त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी एका गावात आपला पहिला सार्वजनिक कार्यक्रम सादर केला आणि त्यांना १० रुपये मानधन मिळाले. त्यांचेचे लग्न वयाच्या १२ व्या वर्षी झाले, पण ती एक स्त्री असल्यामुळे तिच्या समाजाने पांडवानी सादर करण्याच्या तिच्या निर्णयाला समाजातून विरोध केला. त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले आणि शेजाऱ्यांकडून अन्न व भांडी उसने घेऊन एका लहानशा झोपडीत एकटीला राहावे लागले.
प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक हबीब तन्वीर यांनी तीजन बाईंची प्रतिभा ओळखली. त्यानंतर त्यांचे आयुष्य बदलले. नंतर त्यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर कार्यक्रम सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्यामुळे त्या राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाल्या.
1980 पासून, त्यांनी इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, तुर्की, ट्युनिशिया, रोमानिया, सायप्रस, माल्टा आणि मॉरिशस या देशांमध्ये कार्यक्रम केले आणि त्या भारताच्या सांस्कृतिक राजदूत बनल्या. श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोज या दूरदर्शन मालिकेतही तीजन बाई दिसल्या होत्या. त्यांनी महाभारतातील काही दृश्ये सादर केली होती.
सुप्रसिद्ध पंडवानी गायिका तीजन बाई जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। उन्होंने छत्तीसगढ़ की इस लोक कला को अपनी भव्य प्रस्तुति से दुनियाभर में एक विशिष्ट पहचान दिलाई। उनका जाना कला एवं संस्कृति जगत के लिए एक अपूरणीय क्षति है। शोक की इस घड़ी में मेरी संवेदनाएं उनके परिजनों और…
— Narendra Modi (@narendramodi) July 5, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आणि म्हणाले की, तीजन बाईंनी छत्तीसगडच्या लोककलेला जगभरात एक अद्वितीय ओळख दिली. आपल्या भव्य सादरीकरणातून त्यांनी छत्तीसगडच्या या लोककलेला जगभरात एक अद्वितीय ओळख मिळवून दिली. त्यांचे जाणे ही कला आणि संस्कृती जगताची कधीही भरून न येणारी हानी आहे.
तीजन बाईंचे पुरस्कार
• पद्मश्री (१९८८)
• संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९५
• मानद डी. लिट., बिलासपूर विद्यापीठ (२००३)
• पद्मभूषण (२००३)
• एम. एस. सुब्बुलक्ष्मी शताब्दी पुरस्कार (२०१६)
• फुकुओका पुरस्कार (२०१८)
• पद्मविभूषण (२०१९)
हेही वाचा:
Maharashtra Politics : मविआचा एक आमदार फुटणार? संजय राऊतांनी थेट नाव घेत केला धक्कादायक दावा





