पंढरपूरात उज्जैनसारखा कॉरिडॉर; ३ महिन्यात कामाला सुरुवात होणार – देवेंद्र फडणवीस
Updated On:

सोलापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाला येत्या तीन महिन्यांत सुरुवात होणार असल्याचे जाहीर केले. उज्जैन काशी विश्वेश्वरच्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील या प्रकल्पाला फडणवीस यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनानंतर हिरवा कंदील दाखवला. विभागीय आयुक्त, पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत आराखड्याला मंजुरी मिळाली.
फडणवीस म्हणाले, “प्रकल्पग्रस्तांना आतापर्यंतच्या सर्वाधिक मोबदल्यासह योग्य पुनर्वसन केले जाईल. काही घरे, व्यावसायिक मालमत्ता ताब्यात घ्याव्या लागतील. आषाढीपूर्वी काही कामे, तर नंतर मोठी कामे सुरू होतील. दरम्यान, या घोषणेने पंढरपूरच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





