शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे कॉंग्रेसची पंचाईत
Updated On:

नवी दिल्ली -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे मित्रपक्ष कॉंग्रेसची मोठी पंचाईत झाली. त्यातून त्या पक्षाने बरीचशी तोलून-मापून प्रतिक्रिया दिली. पवार यांच्या भूमिकेविषयी पत्रकारांनी ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्याकडून कॉंग्रेसचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
प्रतिक्रिया देताना रमेश म्हणाले, राष्ट्रवादीचे स्वत:चे मत असू शकते. पण, पंतप्रधानांशी संबंधित अदानी समुहाशी निगडीत प्रकरण खरे आणि अतिशय गंभीर असल्याचे 19 समविचारी विरोधी पक्षांना वाटते. भाजपच्या विध्वंसक राजकीय,
सामाजिक आणि आर्थिक अजेंड्याचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीसह 20 समविचारी विरोधी पक्ष एकवटलेले आहेत. भाजपच्या हल्ल्यांपासून लोकशाही आणि राज्यघटनेला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.





