Palghar News : पालघरमध्ये इमारतीला भीषण आग; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
पालघर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री एका १४ मजली इमारतीत भीषण आग (Palghar News) लागली. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून, अन्य सहा जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Palghar News : पालघर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री एका १४ मजली इमारतीत भीषण आग (Palghar News) लागली. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून, अन्य सहा जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेत फाल्गुनी शहा (५०) आणि अश्विनी पारकर (५०) या दोन महिलांचा मृत्यू झाला.नालासोपारा-वसई लिंक रोडवरील इम्पीरियल हाइट्स या इमारतीत रात्री १२:१० वाजता आग लागल्याची माहिती मिळाली, असे वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील (Palghar News) एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, इमारतीतून २५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली, असेही त्यांनी नमूद केले.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, दाट धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. इतर सहा जणांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग वेगाने पसरल्याने इमारतीत घबराट उडाली.
दाट धूर आणि आगीच्या ज्वाळांपासून वाचण्यासाठी चार रहिवाशांनी इमारतीच्या बाहेरील एका छोट्या सज्जाचा आधार घेतला आणि तेथेच अडकून पडले, ते सुमारे ४५ मिनिटे तिथे अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या क्रेनच्या साहाय्याने अडकलेल्यांची सुटका केली.
आगीचे नेमके कारण अद्याप (Palghar News) समजू शकलेले नाही.






