Palakmantri Chashak 2026 : कोयनानगरमध्ये क्रिकेटचा महासंग्राम; पालकमंत्री चषकासाठी जल्लोषमय तयारी
Palakmantri Chashak 2026 : सातारा जिल्ह्यातील कोयनानगर येथे ना. शंभूराज देसाई यांच्या नावाने आयोजित 'पालकमंत्री चषक २०२६' टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होत आहे.

Palakmantri Chashak 2026 : कोयना परिसर पुन्हा एकदा क्रिकेटच्या जल्लोषात न्हाऊन निघणार असून ना. शंभूराज देसाई यांच्या नावाने आयोजित करण्यात आलेल्या पालकमंत्री चषक २०२६ या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन शिवसेना व युवासेना यांच्या वतीने करण्यात आले असून, यात शैलेंद्रदादा शेलार आणि युवासेना तालुकाप्रमुख अजय देसाई यांनी पुढाकार घेतला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून कोयनानगरच्या क्रीडाक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारी ही स्पर्धा यंदाही मोठ्या दिमाखात रंगणार आहे. पाटण तालुका, कोयना विभाग तसेच महाराष्ट्रातील विविध नामांकित ओपन संघांचे आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून, क्रिकेटप्रेमींना थरारक आणि दर्जेदार सामने अनुभवायला मिळणार आहेत.
उद्यापासून दि. २५ ते १ मार्च या कालावधीत येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्साह द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





