मालदीव.. ‘पूल ब्रेकफास्ट आणि…’ ! पलक तिवारीचा रॉयल अंदाज एकदा पहाच

मुंबई – अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी देखील इंडस्ट्रीमध्ये चांगलीच आहे.ती तिच्या स्टाईलने, ड्रेसिंग सेन्सने आणि लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते.नुकतंच पलकनं तिच्या व्हेकेशनवरील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा रॉयल अंदाज पाहायला मिळत आहे. या फोटोजमध्ये पलक एकदम फिट आणि हॉट दिसत आहे.
पलक तिवारीने सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात तिच्याशिवाय शहनाज गिलचीही महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. सध्या पलक आपल्या कामाच्या व्यापातून सुट्टी घेऊन व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
पलकनं शेअर केलेले हे फोटो मालदीवमधील असलयाचे समजते. यावेळी पलकने आपले केस बांधले आहेत आणि ती व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत फ्लोटिंग ब्रेकफास्टही ठेवण्यात आला आहे. पलकचा हा रॉयल लूक पाहण्यासारखा आहे. ती तिच्या शाही थाटातमध्ये थेट स्विमिंग पूलमध्ये उतरून आपल्या ब्रेकफास्टचा आनंद घेताना दिसत आहे.पुलमधील ब्लु पाणी.. समोर विदेशी ब्रेकफास्ट असा हा पलकचा अंदाज चाहत्यांना देखील चांगलाच आवडला आहे.
View this post on Instagram
हार्डी संधूच्या ‘बिजली-बिजली’ या गाण्यातून पलक तिवारीला चांगलीच ओळख मिळाली. बॉलिवूड व्यतिरिक्त पंजाबी इंडस्ट्रीमध्ये देखील पलकचे फॅनफॉलोविंग मोठे आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रेम दिल आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर हार्ट इमोजी पोस्ट करत आपले प्रेम व्यक्त केले आहे.





