संजय दत्त पहिल्यांदाच हॅारर कॅामेडी चित्रपटात; द भूतनीचा ट्रेलर पाहून तुम्ही पोट धरुन हसाल!

Bhutanese trailer | नुकताच द भूतनी या हॅारर कॅामेडी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हॅारर कॅामेडी या जॅानरमध्ये आहे. स्त्री या चित्रपटाने हॅार्रर कॅामेडी हा जॅानर आणला असल्याचे सांगितले. त्यानंतर अनेक हॅारर कॅामेडी जॅानरमधील चित्रपट येत गेले. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त याच्या भूमिकेविषयी चर्चा होत आहे. संजय दत्त प्रथमच एका हॅारर कॅामेडी चित्रपटात काम करत आहे. यामुळे चाहते त्याचा या चित्रपटातील भूमिका पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक झाले आहेत.
स्त्री या चित्रपटाने हॅारर कॅामेडी हा जॅानर आणला. यानंतर स्त्री २, मुंजा या चित्रपटांनी प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले. हे सर्वच चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडले. परिणामी बॅाक्स अॅाफिसवर तगडी कमाई करण्यात या चित्रपटांना यश आले. द भूतनी चित्रपटाचा ट्रेलर पाहताना भीतीपेक्षा हसायला जास्त येते. ट्रेलरमधील हलक्या फुलक्या विनोदामुळे हसू येते. या चित्रपटातील संजय दत्तचा अनोखा अंदाज दाखविण्यात आला आहे. याशिवाय मौनी रॅाय, पलक तिवारी यांच्या देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
या चित्रपटातील ट्रेलरमध्ये मौनी रॅाय एका चेटकीनीच्या भूमिकेत दिसते. तिचा हा लूक पाहून भीती वाटण्याऐवजी हसू अधिक येते. या चित्रपटात संजय दत्त एका आधुनिक तांत्रिकाच्या भूमिकेत दिसत आहे. तो प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने भूताशी लढताना दिसतो, पलक तिवारी ही देखील चेटकीणच्या भूमिकेत असल्याने खरी चेटकीण कोण आहे, याचे गूढ निर्माण होते. यामुळे द भूतनी चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली असून येत्या १८ एप्रिल २०२५ रोजी हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे.




