‘ऑपरेशन सिंदूर’ला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानचे ‘बुन्यान-उल-मर्सूस’ नापाक मिशन; याचा नेमका अर्थ काय?

India Vs Pakistan | पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे जोरदार उत्तर देत आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केल्यानंतर 7 मे रोजी पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागात गोळीबार केला.
तर 8 मे रोजी पाकिस्तानने भारताच्या अनेक भागांना मिसाईल आणि ड्रोनद्वारे लक्ष्य केले होते. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना हवेतच नष्ट केले. सलग दुसऱ्या दिवशीही पाकिस्तानने भारताच्या काही भागांवर ड्रोन आणि मिसाईलद्वारे हल्ला केला. मात्र भारताने नापाक हल्ले परतावून लावले आहे.
‘बुन्यान-ए-मर्सूस’ नावाचा अर्थ
दरम्यान, पाकिस्तानने जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या अनेक शहरांमध्ये हल्ले केले. या ऑपरेशनला पाकिस्तानने बुन्यान-ए-मर्सूस असं नाव दिले आहे. बुन्यान ए मर्सूस हा एक अरबी शब्द आहे. याचा अर्थ एक भक्कम पाया असा होता. साध्या भाषेत सांगायचे झाले तर, एखादी इमारत किंवा पाया जो खूप मजबूतीने संरक्षण करतो, तो जणू सिसासारख्या मजबूत भिंतीसारखा आहे.
बुन्यान-ए-मर्सूस अंतर्गत भारतातील अनेक भागात हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. मात्र भारतीय लष्कराने हे हल्ले हाणून पाडले. पण यात सीमेवर गोळीबारात काही नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारतचे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांचे संबंध पाकिस्तानशी जोडले गेले होते, ज्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवला. अहवालानुसार, भारताच्या या कारवाईत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. अद्यापही ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. India Vs Pakistan |
हेही वाचा:





