ऑस्ट्रेलियातील विश्वकरंडक स्पर्धेतही पाकचा संघ भारतावर बाजी मारेल – अख्तर
Updated On:

लाहोर – विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून पराभूत होण्याची नामुष्कीजनक परंपरा गेल्या वर्षीच्या विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानने मोडली. आता यंदा ऑस्ट्रेलियात होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतही पाकिस्तानचा संघ भारतावर विजय मिळवेल, असा विश्वास पाकिस्तानचा माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने व्यक्त केला आहे.
एकदिवसीय तसेच टी-20 विश्वकरंडक स्पर्धांमध्ये पाकिस्तानला सातत्याने भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, गेल्या वर्षी ही परंपरा खंडित झाली. भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांवर दडपण आणले तर ते सहज आपल्या विकेट बहाल करतात हेच त्या सामन्यात दिसून आले होते. आता यंदाही पाकिस्तानचे गोलंदाज तेच सिद्ध करतील, असेही अख्तर म्हणाला.





