पाकिस्तानी सैन्यावर TTP चा मोठा हल्ला ; २ अधिकाऱ्यांसह ११ जण ठार

Pakistan Terror Attack। अफगाणिस्तानच्या पाकिस्तानी सीमेजवळ दहशतवाद्यांनी लष्करी ताफ्यावर आज हल्ला केला असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात नऊ निमलष्करी सैनिक आणि दोन अधिकारी ठार झाले. पाकिस्तानी तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, रस्त्यावर बॉम्ब पेरण्यात आले होते आणि नंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हा हल्ला वायव्य कुर्रम जिल्ह्यात झाला. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानी तालिबानने अलिकडच्या काही महिन्यांत पाकिस्तानी सुरक्षा दलांवर हल्ले वाढवले आहेत. हा गट सरकार उलथवून कडक इस्लामिक राजवट स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे.
दहशतवाद्यांना अफगाणिस्तानातून प्रशिक्षण Pakistan Terror Attack।
इस्लामाबादचा आरोप आहे की, तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तानच्या सीमेपलीकडून प्रशिक्षण घेतात आणि पाकिस्तानविरुद्ध हल्ल्यांची योजना आखतात. तथापि, काबुल हा आरोप खोटा मानतो.
हिंसाचारात वाढत Pakistan Terror Attack।
इस्लामाबादमधील सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी स्टडीज (सीआरएसएस) ने सोमवारी एक अहवाल प्रसिद्ध केला ज्यामध्ये गेल्या तीन महिन्यांत पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले आणि लष्करी कारवायांमध्ये झालेल्या मृत्युची माहिती देण्यात आली आहे.
अहवालानुसार, दहशतवादी हल्ले आणि लष्करी कारवायांसह एकूण ३२९ हिंसक घटनांमध्ये किमान ९०१ लोक ठार आणि ५९९ जखमी झाले. मागील तिमाहीच्या तुलनेत हिंसाचारात ४६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.





