Pakistan School Bus Terror Attack । पाकिस्तानमध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी एका शाळेच्या बसला लक्ष्य केले आहे. बलुचिस्तानमधील खुजदार याठिकाणी झालेल्या हल्ल्यात चार मुलांचा मृत्यू झाला आहे. तर ३८ जण गंभीर जखमी झाले आहेत. अधिकृत माहितीनुसार, एका आत्मघातकी कार बॉम्बरने शाळेच्या बसला लक्ष्य केले आहे. पाकिस्तानी वृत्तसंकेत स्थळानुसार, स्कूल बस झिरो पॉइंटजवळ होती. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना क्वेटा आणि कराची येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले, “मुलांना लक्ष्य करणाऱ्या हल्लेखोरांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.” देशाविरुद्ध कट रचला जातोय पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने शोषलं मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मोहसिन नक्वी यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. तसेच आपल्या पोस्टमध्ये, “शत्रूंनी निष्पाप मुलांना त्यांचे बळी बनवले आहे. हा हल्ला देशात अस्थिरता निर्माण करण्याचा घृणास्पद कट आहे. देशाच्या एकतेमुळे प्रत्येक कट अयशस्वी होईल.” असे म्हटले आहे. बलुचिस्तानबाबत पाकिस्तानमध्ये खूप तणाव Pakistan School Bus Terror Attack । बलुचिस्तानबाबत पाकिस्तानमध्ये खूप तणाव आहे. त्याला पाकिस्तानपासून वेगळे होऊन एक वेगळा देश व्हायचे आहे. बलुचिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून फुटीरतावादी कारवाया सुरू आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान, बलुचिस्तानच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्यालाही लक्ष्य केले होते. पाकिस्तान हा दहशतवादाचा बालेकिल्ला पाकिस्तान हा दहशतवादाचा गड आहे आणि तो त्याचा वापर भारताविरुद्ध करत आहे. पाकिस्तानने पाठवलेल्या दहशतवाद्यांनी नुकताच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हल्ला केला होता. यामध्ये २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. आता पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी बनत आहे. या वर्षी पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. हेही वाचा कर्नाटकच्या गृहमंत्र्यांच्या रुग्णालयावर ईडीचा छापा ; राण्या रावच्या प्रकरणाशी संबंध